छत्रपती संभाजीनगर : विमानतळाच्या आवारातील झाडाझुडपात ड्रोन आढळल्याने खळबळ उडाली. गुरुवारी (दि.९) सकाळी ६:३० वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
सीआयएसएफचे पोलिस निरीक्षक धनंजयकुमार सिंग यांनी याप्रकरणी तक्रार दिली. गुरूवारी सकाळी विमानतळ परिसरात त्यांचे सहकारी गस्त घालत होते. हेड कॉन्स्टेबल संतोष आव्हाड, नंदकुमार हे वॉच टॉवर ७ जवळ काम करत असताना त्यांना झुडपात एक ड्रोन पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ धनंजयकुमार यांना कळवले. त्यानंतर सदर ड्रोन त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेत तक्रार दिली. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ड्रोन तुटलेल्या व काहीसे गंजलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे ते काही दिवसांपूर्वी पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चांदीच्या रंगाचे हे ड्रोन पॉवर फोल्डिंग फ्यूजलेज ब्रशलेस कंपनीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टॉय ड्रोन प्रकारातलेविमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास पूर्णपणे मनाई असते. असे केल्यास गंभीर गुन्हा दाखल होतो. प्राथमिक निरीक्षणानुसार, विमानतळात आढळलेले ड्रोन हे नॉन जीपीएस ड्रोन आहे. त्यात कुठल्याही प्रकारचे जीपीएस, सिरियल क्रमांक नसतो. हे चायनीज बनावटीचे व नॉन कमर्शियल असून त्याला टॉय ड्रोनही म्हणतात. त्याला हलक्या दर्जाचा कॅमेरा असतो. रेंज अत्यंत कमी असल्याने फार दूर व वरपर्यंतही ते उडत नाही. त्यामुळे हे जवळूनच उडवले असावे, असे निरीक्षण ड्रोन व्यावसायिक गणेश कासले यांनी नोंदवले.
Web Summary : A drone was found in the bushes near Chhatrapati Sambhajinagar Airport. Police filed a case after the discovery. The drone appeared damaged and possibly old, lacking GPS and commercial features, suggesting it was a toy drone flown nearby.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे के पास झाड़ियों में एक ड्रोन मिला। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। ड्रोन क्षतिग्रस्त और पुराना प्रतीत होता है, जिसमें जीपीएस और वाणिज्यिक सुविधाएँ नहीं हैं, जिससे पता चलता है कि यह एक खिलौना ड्रोन था जो पास में उड़ाया गया था।