शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात परीक्षा संपून उत्तरपत्रिका शिल्लक असतानाही ३८ लाख उत्तरपत्रिका खरेदीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:22 IST

परीक्षा विभागाने १ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या ३८ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा घाट घातला आहे. 

ठळक मुद्दे१ कोटी ६८ लाख रुपये किंमत५ लाख उत्तरपत्रिका शिल्लक असताना आणखी खरेदी कशासाठी?

- राम शिनगारे 

औरंगाबाद : पदवी परीक्षा संपल्यानंतरही ४ लाख ८९ हजार ९६७ उत्तरपत्रिका शिल्लक असताना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या ३८ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा घाट घातला आहे. 

विशेष म्हणजे मार्च/एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही परीक्षा नसतानाही यासाठीची निविदाची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र व्यवस्थापन परिषद सदस्याने शिल्लक उत्तरपत्रिकांची माहिती मागविल्यामुळे ही खरेदी प्रक्रियाच थांबविण्यात आली. तरीही २ लाख उत्तरपत्रिका खरेदी करण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका शिल्लक असतानाही परीक्षा विभागाने तब्बल २४ पानांच्या ३० लाख, ३६ पानांच्या ३ लाख आणि ८ पानांच्या ५ लाख उत्तरपत्रिका खरेदी करण्याचा घाट घातला होता. याविषयीच्या निविदा कुलगुरूंकडे मंजुरीसाठी आल्या होत्या. याची माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांना समजली. त्यांनी विद्यापीठाशी संलग्न पाच महाविद्यालयांकडून शिल्लक उत्तरपत्रिकांची माहिती घेतली असता, परीक्षेनंतरही शिल्लक उत्तरपत्रिकांचा आकडा मोठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नव्याने खरेदी करणाऱ्या ३८ लाख उत्तरपत्रिकांच्या निविदेला डॉ. अंभोरे यांनी विरोध दर्शविला.

यामुळे  सुमारे १ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या उत्तरपत्रिका खरेदीला ब्रेक लागला. मात्र याच वेळी परीक्षा विभागाकडे उत्तरपत्रिका शिल्लक असाव्यात, यासाठी २४ पानांच्या २ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यात आली. यामुळे सद्य:स्थितीत परीक्षा विभागाकडे २४ पानांच्या ६ लाख १६ हजार ९६७ आणि ८ पानांच्या ७३ हजार उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत. ३६ पानांच्या उत्तरपत्रिका मात्र, संपल्या आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांकडून मिळाली. 

उत्तरपत्रिकांचे असे आहेत दरविद्यापीठ २४ पानांची उत्तरपत्रिका ४ रुपये ७५ पैसे, ३६ पानांची ६ रुपये आणि ८ पानांची उत्तरपत्रिका २ रुपयांना खरेदी करते. एका सत्र परीक्षेला काही दिवसांपूर्वी संपलेल्या परीक्षेनुसार अंदाजे १५ लाख उत्तरपत्रिका लागतात. यामुळे ५ लाख उत्तरपत्रिका शिल्लक असताना ३८ लाख उत्तरपत्रिका खरेदीचा घाट कोणासाठी घालण्यात आला होता, हे कोडे नाही.

यापुढे एकही उत्तरपत्रिकांची खरेदी होणार नाहीविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मागील दहा वर्षांत खरेदी केलेल्या उत्तरपत्रिकांचा आकडा आचंबित करणारा आहे. निव्वळ कमिशनसाठी कोट्यवधी रुपयांच्या उत्तरपत्रिका खरेदी करण्यात येतात. यामुळे अवघ्या सव्वाकोटी रुपयांत विद्यापीठाची प्रिंटिंग प्रेस अद्ययावत होऊ शकते. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेत प्रयत्न करण्यात येतील. येत्या १२ डिसेंबर रोजीच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत ठराव मांडण्यात येणार आहे. मार्च/एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या उत्तरपत्रिकाच उपलब्ध होतील. यापुढे एकही उत्तरपत्रिकांची खरेदी करावी लागणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ.  अंभोरे यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय