शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘रेखांकन’ म्हणजे स्त्रीचा खरा सन्मान

By admin | Updated: July 21, 2014 00:37 IST

नांदेड : सामाजिक, धार्मिक रूढी परंपरांना छेद देत स्त्रीचा सन्मान करण्याचे अन् परिवतर्नवादी विचार पेरण्याचे काम ‘रेखांकन’मधील लिखाणातून अ‍ॅड़पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे,

नांदेड : सामाजिक, धार्मिक रूढी परंपरांना छेद देत स्त्रीचा सन्मान करण्याचे अन् परिवतर्नवादी विचार पेरण्याचे काम ‘रेखांकन’मधील लिखाणातून अ‍ॅड़पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे, असे मत परिसंवादात सहभागी साहित्यिक प्रा़महेश मोरे, लेखिका प्रा़डॉ़ करूणा जमदाडे यांनी व्यक्त केले़ शिवनेरी पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने नियोजन भवन येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़पुरूषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘रेखांकन’ या पुस्तकावर परिसंवाद कार्यक्रम अ‍ॅड़ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला़ मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले़ मसेसंचे केंद्रीय सचिव मधुकरराव मेहकरे, विभागीय अध्यक्ष तथा विक्रीकर सहाय्यक आयुक्त एकनाथराव पावडे, इंजि़ शे़ रा़ पाटील, मसेसंचे जिल्हाध्यक्ष प्राग़णेश शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनकर्णाताई ताटे, बाळासाहेब इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविकात शिवनेरी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी परिसंवाद आयोजनामागील भूमिका विशद केली़ साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा असून रेखांकनच्या माध्यमातून पुढे आलेल्या साहित्यात स्त्री जीवनाचा खरा सन्मान केला आहे, असे मत साहित्यिक प्रा़महेश मोरे यांनी व्यक्त केले़ या पुस्तकामध्ये अ‍ॅडख़ेडेकर यांनी सडेतोड विचारातून केलेले लिखाण आणि बोली भाषेतील शब्दरचना अप्रतिम असून ती वाचकांच्या मनाला भिडणारी आहे, असे मोरे म्हणाले़ सदरील पुस्तकात दैनंदिन व्यवहारात वापरात येणारे, परंतु लेखणीतून प्रत्यक्ष उतरलेले अनेक शब्द नवसाहित्यिकांना प्रेरणा देणारे आहेत़ सदरील पुस्तक विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमास यावे, अशी अपेक्षा प्रा़ मोरे यांनी व्यक्त केली़अ‍ॅड़ खेडेकर यांनी रेखांकनमध्ये केलेले शब्दांकन वाचकाच्या मनाला भुरळ पाडणारे असून ते वाचताना व्यक्तीला थांबायची इच्छा होत नाही, असे मत लेखिका डॉक़रूणा जमदाडे यांनी मांडले़ जगातील कोणत्याही नवरा-बायकोला प्रेरणा देणारे हे जोडपे असल्याचे पुस्तकातील प्रसंगावरून दिसून येते़ खेडेकर यांनी परिवर्तनाची चळवळ उभी करताना तिची सुरूवात स्वत:पासून केली़ त्यांनी त्यांच्या पत्नी माजी आ़रेखाताई यांना दिलेल्या सन्मानावरून त्यांचा स्त्रीविषयी असलेला दृष्टिकोण समोर येतो, असे डॉ़जमदाडे यांनी सांगितले़ स्त्रीला स्वतंत्र विचार, इच्छा व्यक्त करण्याची संधी तसेच आवडेल त्या क्षेत्रात काम करू देण्याची त्यांची महत्वाकांक्षा महत्वाची असून त्यांच्या विचारातून स्त्रियांना दया नको तर दर्जा हवा, असे स्पष्ट होते़ स्त्री कुटुंबाच्या केंद्रस्थानी असून तिच्यावर सर्व कुटुंंब आधारित असते, हे सांगताना त्यांनी रेखाताई आजारी पडल्याचा प्रसंग अतिशय संवेदनापूर्ण रेखाटला आहे, तो वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले़ अ‍ॅड़ खेडेकर म्हणाले, काही लोक नको त्या व्यक्तीच्या पायावर डोके ठेवतात़ त्यापेक्षा आई अथवा बायकोच्या पायावर ठेवा, त्या तुमच्यासाठी नक्कीच पथदर्शक ठरतील़ स्त्रियांचा सन्मान करणारे जोतिबा जोपर्यंत तयार होणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा आदर होणार नाही़ प्रारंभी अ‍ॅड़ दिगांबर देशमुख यांनी जिजाऊवंदना सादर केली़ परिसंवादाचे निवेदन राजश्री शिंदे- मिरजकर यांनी केले तर डिगा पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)