शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडून ड्रेनेज कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:11 IST

वाळूज महानगर : वडगावमधील अस्वच्छतेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या सिडको प्रशासनाने बुधवारपासून ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले. या कामाला सुरुवात झाल्याने दुर्गंधीतून कायमची सुटका होणार असल्याने येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

दिलासा: फुलेनगर वासियांची होणार दुर्गंधीतून सुटकावाळूज महानगर : वडगावमधील अस्वच्छतेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या सिडको प्रशासनाने बुधवारपासून ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले. या कामाला सुरुवात झाल्याने दुर्गंधीतून कायमची सुटका होणार असल्याने येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीतील सिडको अंतर्गत येणाऱ्या द्वारकानगरी, दिशा कुंज रेसिडेन्सी, सहारा भूमी, साई प्रेरणा नगरी आदी नागरी वसाहतीचे ड्रेनेज व सांडपाणी जाण्यासाठी सिडकोने ड्रेनेजलाईनची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सारखे चेंबर तुंबून घाण पाणी वडगावातील फुलेनगर व छत्रपतीनगरालगत साचत. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढल्याने नागरिकांना साथरोगाला तोंड द्यावे लागत होमे. शिवाय पाण्यासाठी खोदलेल्या खड्यापासून शाळकरी मुले व नागरिक ये-जा करित असल्याने खडड््यात पडण्याचा धोकाही निर्माण झाला होता. मागील आठवड्यात एक जण खड्ड््यात पडल्याची घटनाही घडली आहे.

आजाराच्या समस्येबरोबरच दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव झाला होता. नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत व सिडकोकडे याविषयी अर्ज, विनंत्या करुनही याकडे कोणी लक्ष देत नव्हते. अखेर लोकमतने ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे वृत्त प्रकाशित करुन नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडून हा प्रश्न लावून धरला. लोकमतच्या वृत्ताची दखल घेवून सिडको प्रशासनाने ड्रेनेजलाईनचे काम तात्काळ हाती घेवून बुधवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

प्रशासनाकडून येथील आनंद बुद्ध विहारापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत ड्रेनेजलाईन टाकून ती सिडकोच्या मुख्य ड्रेनेजलाईनला जोडली जाणार आहे. सद्य स्थितीत जेसीबीने खोदकाम करुन त्यात पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर जोडणी केली जाणार आहे. सिडकोने ड्रेनेजलाईनचे काम सुरु केल्याने येथील रहिवाशांची दुर्गंधी व डासातून सुटका होणार आहे. लोकमत मुळेच ड्रेनेजच्या कामाला गती मिळाल्याचे सांगत येथील रहिवाशांनी लोकमतचे विशेष आभार मानले आहेत.

डांबरी रस्ताही करणारआनंद बुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार कमानीपर्यंत पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील रहिवाशांची ये-जा करण्यासाठी मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखल तुडवत ये-जा करावी लागते. त्यामुळे सिडकोने नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ड्रेनेजलाईनच्या कामाबरोबरच हा रस्ताही डांबरी करुन देणार आहे. असे सिडकोचे अभियंता उदयराज चौधरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :cidcoसिडकोAurangabadऔरंगाबाद