शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रंगला नाट्याविष्काराचा तरुण सोहळा!

By admin | Updated: September 4, 2014 00:51 IST

स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा ‘पेज टू स्टेज’ एकांकिका महोत्सव बुधवारी उत्तरोत्तर रंगत गेला. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष होते.

औरंगाबाद : चेहऱ्यावर मेकअप चढवत खुलणारे, आरशात स्वत:चंच बदललेलं रूप पाहत हरखणारे चेहरे, आत कुठेतरी हुरहुर लागलेली असतानाच सहकलाकाराच्या पाठीवर मारलेली थाप, गुरूला पाहताच नकळत वाकलेल्या माना, नटराजासमोर मंद दरवळणारा धूप... आणि अवचित वाजलेल्या तिसऱ्या घंटेच्या पार्श्वसंगीतासह वर गेलेला पडदा... स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा ‘पेज टू स्टेज’ एकांकिका महोत्सव बुधवारी उत्तरोत्तर रंगत गेला. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिनयासह लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य अशा सर्वच आघाड्या समर्थपणे सांभाळत तीन एकांकिकांचे सादरीकरण केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, उपप्राचार्य एस. एन. ठोंबरे उपस्थित होते. बालनाट्य चळवळीतील कार्यकर्ते रमाकांत मुळे, सुधीर देवगावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. देशपांडे म्हणाले, ‘सरस्वती भुवन संस्था शताब्दी वर्षात पदार्पण करते आहे. त्या औचित्याने येत्या काळात संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत नाट्य महोत्सव, बालनाट्य स्पर्धा व आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाही आयोजित करणार आहे.’ प्रा. किशोर शिरसाठ म्हणाले, ‘विद्यार्थ्याने नाट्यशास्त्राचे धडे केवळ पुस्तकातून न गिरवता त्याचे प्रात्यक्षिकही करावे यासाठी हा विद्यार्थीकेंद्री महोत्सव आम्ही सुरू केला. यातूनच उद्या नवे लेखक, अभिनेते घडतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.’ मानसिक संतुलन गमावलेल्या आईचा अकाली प्रौढ झालेला समजूतदार मुलगा, त्यांच्यातील गहिऱ्या नात्याचे हळवे दर्शन संतोष गायकवाड याच्या ‘पुन्हा एकदा’ या एकांकिकेने घडविले. अनेक प्रसंगांमध्ये भावुक होत रसिकांनी डोळ्याला रुमाल लावले. वर्तमानातील राजकीय-सामाजिक वास्तवावर सादर केलेल्या प्रवीण पारधे याच्या ‘देव तुझं भलं करो’ या उपरोधी विनोदीनाट्याने रसिकांना मनसोक्त हसवले, तर भाऊसाहेब सोनावणे याने लिहिलेल्या ‘दुभंग’ या प्रेमभंगाच्या कथेने नि:शब्द केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा. योगिता महाजन, प्रा. नितीन गरुड व डॉ. गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.