शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजचे काम चार वर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:27 IST

वाळूज महानगर: बजाजनगरातील बीओटी तत्वावरील ड्रेनेजलाईनच्या कामाचे भिजत घोंगडे कायम असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता या योजनेचे काम करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून नव्याने निवीदा प्रकिया सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही योजना केव्हा कार्यान्वित होणार, असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.

वाळूज महानगर: बजाजनगरातील बीओटी तत्वावरील ड्रेनेजलाईनच्या कामाचे भिजत घोंगडे कायम असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता या योजनेचे काम करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून नव्याने निवीदा प्रकिया सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही योजना केव्हा कार्यान्वित होणार, असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.

जाजनगर या कामगार वसाहतीचा ड्रेनेजलाईनचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) तत्वावर जवळपास साडेबारा कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचे काम हाती घेतले होते. या कामासाठी मुंबईच्या भारत उद्योग लि. या कंपनीची निवीदा मंजूर करण्यात आली होती.

या योजनेचे काम संबंधित भारत उद्योग कंपनीकडून सब-ठेकेदाराला देण्यात आले. दरम्यान, या कामावरुन मूळ ठेकेदार व सब ठेकेदार यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे या योजनेचे काम साधारणपणे चार वर्षांपूर्वी बंद पडले आहे. आजघडीला या योजनेंतर्गत बजाजनगरात पाईपलाईन टाकण्याचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झालेले असून, एसटीपीचे काम ३० ते ४० टक्क्यापर्यंत झाले आहे.

नियोजित वेळेत या योजनेचे काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराचा वाद न्यायालयात गेल्याने या योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अनेक नागरिकांनी सेफ्टी टँक सोसायटीच्या समोर उभारले आहे. मात्र, सेफ्टी टँक सतत चोक अप होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांत वाद होण्याचे प्रकार घडतात. या परिसरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाशी सतत पाठपुरावा करुन या योजनेचे काम सुरु करण्याची मागणी लावून धरली होती.बजाजनगरातील ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने नव्याने निविदा प्रकिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्यापपर्यंत निविदा प्रकिया पूर्ण न झाल्याने या योजनेचे काम सुरु झालेले नाही. निवीदा मंजूर होताच ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरवात केली जाईल.- भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद