शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३३ महिने झाले तरी पीएच.डी.चा व्हायवा होईना; संशोधनानंतरही विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना!

By राम शिनगारे | Updated: November 7, 2025 17:45 IST

संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीऐवजी विद्यापीठातील पीएच.डी. विभाग अडचणीचा ठरत असल्याचे विविध प्रकरणांवरून समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागात १६ जानेवारी २०२३ रोजी शोधप्रबंध सादर केला. त्यास आता ३३ महिने २० दिवसांचा कालवधी लोटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांस अद्यापही पीएच.डी.चा व्हायवा (मौखिक परीक्षा) घेण्यासाठी कळविण्यात आले नाही. हा प्रकार लोकप्रशासन विषयात घडल्याची माहिती समोर आली आहे.

संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीऐवजी विद्यापीठातील पीएच.डी. विभाग अडचणीचा ठरत असल्याचे विविध प्रकरणांवरून समोर आले आहे. पीएच.डी. विभागामध्ये विद्यार्थ्यांनी प्रगती अहवालसह इतर कागदपत्रे जमा केल्यानंतर ते संबंधितांच्या फाईलला जोडलेच जात नाहीत. संबंधित विषयाच्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवरच ते पडून असतात. काही कालावधीनंतर तेथून गहाळही होतात. त्याचे संबंधितांना काहीही देणे-घेणे नसते. जेव्हा विद्यार्थी शोधप्रबंध जमा करण्यासाठी येतो तेव्हा त्यालाच आपण दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रत पुन्हा जमा करून फाईल तयार करावी लागते. विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा अंतिम गोषवारा ‘आरआरसी’मध्ये मंजूर होणे, त्यानंतर तपासणीसाठी पॅनल प्राप्त होते. त्या पॅनलकडून शोधप्रबंधाच्या मूल्यांकनासाठी होकार येणे आणि त्यानंतर शोधप्रबंध संबंधित तज्ज्ञांना पाठविणे. तज्ज्ञांनी शोधप्रबंध तपासून पाठविल्यानंतर मौखिक परीक्षा आयोजित केली जाते. लाेकप्रशासन विषयात विष्णू वैजनात मुरकुटे या संशोधकाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे या विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा तुलनात्मक प्रशासकीय अभ्यास’ या शीर्षकाचा शोधप्रबंध १६ जानेवारी २०२३ रोजी पीएच.डी विभागात जमा केला होता. त्याचा अद्यापही व्हायवा झाला नसल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.

दिरंगाईची अनेक उदाहरणे समाेरमौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. एस. एच. काद्री यांचा रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याचा शोधप्रबंध १८ डिसेंबर २०२४ रोजी जमा झाला आहे. डॉ. निशीकांत आल्टे यांच्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयातील शोधप्रबंध ८ जानेवारी २०२५ रोजी जमा केलेला आहे. प्रा. संदीप चौधरी यांच्या विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध २७ जून २०२५ रोजी जमा झाला आहे. त्याचे पुढे काय झाले, याची माहितीच मिळतच नाही. त्याशिवाय डॉ. विक्रम खिलारे, डॉ. सुरेश चौथाईवाले आदी मार्गदर्शकांच्या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधाचे काय झाले, याचीही माहिती संबंधितांना मिळत नसल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले.

सात महिन्यांनी मिळाले नोटिफिकेशनहिंदी विषयातील एका संशोधकाचा ‘व्हायवा’ ३१ डिसेंबर २०२४ रोजी झाला होता. त्यानंतर ८ दिवसांमध्ये अपेक्षित असलेले नोटिफिकेशन तब्बल १ ऑगस्ट २०२५ रोजी निघाल्याची ‘आपबिती’ एका संशोधक विद्यार्थ्यांने ‘लोकमत’कडे मांडली.

English
हिंदी सारांश
Web Title : PhD Viva Delayed: Student Struggles Continue After Research Submission

Web Summary : Students at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University face PhD delays. Submitted theses languish, paperwork gets lost, and viva dates are postponed, hindering academic progress in public administration and other departments, causing significant frustration.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र