शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने शैक्षणिक नियोजनासाठी नेमले ‘टास्क फोर्स’ : कुलगुरू येवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली.

ठळक मुद्देउच्च शिक्षणाचा पॅटर्न बदलावा लागणारअध्यापन, मूल्यांकनामध्ये फेरबदल होणार

औरंगाबाद : ‘पोस्ट कोविड-१९’मुळे उच्च शिक्षणाचा पॅटर्न बदलावा लागणार असून, अध्यापन, मूल्यांकन यामध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. यासाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीत आगामी वर्षभरात केलेल्या विविध उपाययोजनांबदल चर्चा करण्यात आली. आॅनलाईन शिक्षणासाठी प्रमाणे ‘ई-बामु पाठशाला’ हे वेबपोर्टल लवकरच विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून कन्टेन्ट, आॅनलाईन लेक्चर्स, विविध विषयांवरचे व्हिडिओ विकसित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर साडेतीन महिन्यांपासून विद्यापीठ मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर येथील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग काही प्रमाणात बंद असले तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

आगामी काळात कोरोनानंतरचे शिक्षण खूप बदलणार आहे. टास्क फोर्सच्या नियमित बैठका घेण्यात येतील व महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात येतील. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कशा पद्धतीने अध्यापन, प्रात्यक्षिके, संशोधन, परीक्षा व मूल्यांकन करावयाचे, याबद्दलचा निर्णय या माध्यमातून घेण्यात येईल, असेही मा. कुलगुरू म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन उच्चशिक्षण विभाग या सर्वांशी समन्वय ठेवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब लक्षात घेऊनच ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीत प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह टास्क फोर्सचे सर्व सदस्य सहभागी झाले. 

‘व्हायरॉलॉजी’ विभागाचा राज्य शासनाकडे प्रस्तावकोविड-१९ नंतर जिवाणू व विषाणूपासून होणारे विविध आजार व त्याचे संशोधन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाच्या वतीने ‘डिपार्टमेंट ऑफ व्हायरॉलॉजी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच राज्य शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्यात येईल. राज्य शासनाची मान्यता, तसेच आर्थिक निधी मंजूर होणे गरजेचे आहे, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. कोरोना टेस्टिंंगसाठी दोन लॅब असणारे राज्यातील आपले पहिलेच विद्यापीठ  ठरले आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र