शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:33 IST

‘नॅक’च्या गुणांकनात ‘सीजीपीए’ ३.०७ वरून ३.२२ वर पोहोचला

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) केलेल्या मूल्यांकनानंतर ‘अ’ दर्जा कायम ठेवला आहे. २०१३ साली झालेल्या मूल्यांकनात विद्यापीठाला मिळालेला ‘सीजीपीए’ ३.०७ वरून ३.२२ वर पोहोचला आहे.

विद्यापीठाचे ‘नॅक’च्या सहा सदस्यीय समितीने २५ ते २७ मार्चदरम्यान तीन दिवस मूल्यांकन केले होते. यात समितीच्या सदस्यांनी पायाभूत सुविधांची पाहणी, विविध विभागांना भेटी, आजी-माजी विद्यार्थी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी  संवाद साधला होता. २७ मार्च रोजी मूल्यांकन केल्याचा अहवाल बंद पाकिटामध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि बंगळुरू येथील कार्यालयाला पाठविण्यात आला होता.

बंगळुरू येथे ‘नॅक’च्या उच्चस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये देशभरात ‘नॅक’कडून मूल्यांकन करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला एकूण ७ विभागांत ३०६९ गुणांपैकी ९५२ गुण प्राप्त झाले आहे. या गुणांचा ‘सीजीपीए’ हा ३.२२ एवढा होत असल्यामुळे ‘अ’ दर्जा बहाल करण्यात येत असल्याचा ई-मेल ‘नॅक’कडून विद्यापीठ प्रशासनाला आला आहे. २०१३ मध्ये हाच ‘सीजीपीए’ ३.०७ एवढा होता. त्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि राज्य शासनाकडून निधी मिळण्याचे दरवाजे उघडले आहेत.

‘नॅक’कडून मागील वर्षभरापासून मूल्यांकनाची पद्धत बदलण्यात आली आहे. मूल्यांकन अधिक पारदर्शकपणे होण्यासाठी ७० टक्के गुणांचा डाटा आॅनलाईन मागविण्यात येतो. हा मागविलेला डाटा त्रयस्थ संस्थेकडून तपासला जातो. विद्यार्थ्यांच्या फिडबॅकला ५ टक्के गुण दिले जातात. हा फिडबॅकही आॅनलाईनच दिला जातो. उर्वरित २५ टक्के गुणांसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समिती पाठविण्यात येते. या पद्धतीने राज्यात पहिल्यांदाच विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यशस्वी ठरले असून, पूर्वीचा दर्जा कायम ठेवतानाच ‘सीजीपीए’मध्ये ०.१५ ने वाढ मिळविली असल्याचे विद्यापीठाच्या ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. ०.४ ने गुण वाढले असते, तर विद्यापीठाला ‘अ प्लस’ दर्जा  मिळाला असता, हे शल्य कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

‘आयक्वॅक’ संचालकांनी दिला राजीनामाविद्यापीठाच्या ‘नॅक’ची संपूर्ण धुरा सहकाऱ्यांच्या मदतीने एकहाती सांभाळणारे ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी ‘नॅक’कडून दर्जा बहाल केल्याचे कळताच आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे पाठविला आहे. याविषयी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, विद्यापीठाला असणारे घटनाकारांचे नाव आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे दिलेली जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पूर्ण केली. आता या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी राजीनामा दिल्याचे डॉ.शिरसाठ यांनी सांगितले. कुलगुरूंकडून सतत ‘नॅक’ कामाच्या निमित्ताने होणारा अपमान, मिळणारी वागणूक सहन केली. मात्र माझ्यासारखा स्वाभिमानी प्राध्यापक हा प्रकार जास्त काळ सहन करू शकत नाही, अशी भावना व्यक्त करून डॉ. शिरसाठ यांनी राजीनामा सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘आपलं’ विद्यापीठ ही भावना ठरली निर्णायकविद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून रात्रंदिवस काम केले. तीन महिन्यांपासून विद्यापीठातील प्रत्येक जण ‘आपलं विद्यापीठ’ म्हणून मेहनत घेत होता. अनेकांनी सुट्टीच्या दिवशीही ‘नॅक’च्या कामाला  वाहून घेतले. यामुळेच पहिला ‘अ’ दर्जा टिकवता आला. त्यात अधिक गुणवत्तेची भरही पडली, अशी प्रतिक्रिया डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

विद्यापीठाला ‘ए प्लस’ दर्जा मिळायला पाहिजे होता. त्यादृष्टीनेच तयारी केली होती.  हा दर्जा थोडक्यात हुकला. तरीही नवीन नियमानुसार ‘अ’ दर्जा टिकवला हेसुद्धा कौतुकास्पद आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘आपलं विद्यापीठ’ या भावनेतून केलेल्या कामामुळे हे यश मिळाले आहे.- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र