शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे नवीन वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन पद्धतीने पदवीचे पेपर ३ मे, तर पदव्युत्तरच्या परीक्षा ५ मेपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:08 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाने १५ मार्चपासून कडक निर्बंध लागू केल्यामुळे १५ ते ३० एप्रिलदरम्यान होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर स्थगित करून ते पुढे ढकलण्यात आले.सलग दुसऱ्यावर्षी उन्हाळ्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ एप्रिलपासून स्थगित केल्या होत्या. आता बीए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे उर्वरित पेपर ३ मे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ५ मेपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या दि्वतीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा १६ मार्चपासून, बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा ७ एप्रिलपासून, तर ६ एप्रिलपासून अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आल्या.

दरम्यान, राज्य शासनाने १५ मार्चपासून कडक निर्बंध लागू केल्यामुळे १५ ते ३० एप्रिलदरम्यान होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर स्थगित करून ते पुढे ढकलण्यात आले. या स्थगित परीक्षेचे उर्वरित पेपर आता ३ मेपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून सुरू होणार आहे. यासाठी महाविद्यालयीनस्तरावर संगणक समन्वयकांची (आयटी कॉर्डिनेटर) संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा व भवितव्य महत्त्वाचेसलग दुसऱ्यावर्षी उन्हाळ्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची असून त्यांचे भवितव्य देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा, वेळेत निकाल व पुढील शैक्षणिक सत्र लवकर सुरू करणे गरजेचे आहे. केवळ तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा