शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

औंढ्यातील दलित वस्तीमध्ये दगडफेक

By admin | Updated: August 19, 2014 02:07 IST

औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

औंढा नागनाथ : येथील दलित वस्तीमध्ये मागील पाच दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या वेळी अचानकपणे दगड फेकत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत पोलिसांच्या वतीनेसुद्धा पाहणी करण्यात आली. नेमके कोठून दगड फेकल्या जातात याचा शोध अद्याप लागलेला नाही. औंढा येथील सिद्धार्थनगरमध्ये दलित वस्तीमध्ये सकाळपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत अर्धा किलो वजनाचे दगड अचानक घरांवर, छतावर व अंगणामध्ये पडत आहेत. त्यामुळे वृद्ध व मुलांना घराच्या बाहेर पडणे म्हणजेच जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. गुरूवारपासून सतत दगडाचा पाऊस पडत असून सोमवारी या घटनेचा पाचवा दिवस होता. या भागातील नागनाथ मुळे, सुमेध मुळे, अरविंद मुळे, प्रकाश मुळे, सदानंद मुळे, मोहन गव्हाणे, करण ढगे यांनी या घटनेची माहिती पोनि लक्ष्मण केंद्रे यांना दिली. त्यांनी सपोनि ज्ञानोबा पुरी यांच्यासोबत शनिवारी या भागाला भेट दिली. घडत असलेल्या प्रकाराची पाहणी केली. कोणत्या दिशेने दगडाचा मारा केला जातो, याचा थांगपत्ता अद्याप त्यांना लागलेला नाही. या वस्तीमध्ये अंधार असतो त्यामुळे या वस्तीत पथदिव्यांची मागणी केल्या जात आहे. रात्रीच नव्हे, तर दिवसाही हा प्रकार घडत असल्याने या मागचा सूत्रधार शोधण्याची गरज आहे. (वार्ताहर)