औरंगाबाद : कुत्रा चावल्यामुळे घाटीत उपचार घेत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन जणांचा उपचार सुरू असताना घाटीत मृत्यू झाला.मृतांपैकी एक तरुण चिकलठाणा येथील रहिवासी आहे. दीड महिन्यापूर्वी एका कुत्र्याने त्यास चावा घेतला होता. मात्र, त्यानंतर त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर मित्राने त्यास घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी मृत्यू झाला. तर तीन महिन्यांपूर्वी एका ७५ वर्षीय आजीबाईच्या हाताच्या बोटाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.कुत्रा चावल्यास जखम धुऊन काढावीकोणत्याही प्रकारच्या कुत्र्याने लचका तोडल्यानंतर जखम तातडीने धुऊन काढली, तर रेबीजचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्यामुळे कुत्रा चावताच रुग्णाला दवाखान्यात नेण्यापूर्वी जखम नळाखाली धरून साबणाने धुऊन काढावी. त्यानंतरच रुग्णास दवाखान्यात आणावे, असे आवाहन घाटीतील मेडिसीन विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर चंद्रकांत लहाने यांनी केले आहे.
कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू
By admin | Updated: July 22, 2014 00:37 IST