लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या वीज बिल विभागातील महत्त्वाचे दस्ताऐवज गायब झाले असून, हे दस्ताऐवज शोधताना कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ वीज बिल प्रकरणात मनपातील एका कर्मचाºयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असताना आता हे दस्ताऐवज गायब करण्यामागे आणखी कोण कार्यरत आहे, या विषयी चर्चेला उधान आले आहे़परभणी महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महावितरणला आरटीजीएसच्या माध्यमातून वीज बिलापोटी देण्यात आलेल्या पैशांतून ७१ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मनपातील विद्युत विभागाचे सहाय्यक अ़ जावेद अ़ शकूर व महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे़ या प्रकरणात खोलवर जावून माहिती घेतली असता, मनपाच्या विद्युत विभागातील काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज गेल्या काही दिवसांमध्ये गायब झाले असल्याची माहिती समोर आली आहे़ हे दस्ताऐवज शोधताना मनपातील कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ या प्रकरणातील आरोपी अ़ जावेद यांना मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे़ या पार्श्वभूमीवर मनपातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज गहाळ झाल्याने हे दस्ताऐवज कोणी गहाळ केले? कधी गहाळ झाले? या विषयी मनपा वर्तुळातून चर्चेला उधान आले आहे़
वीज बिलाच्या फाईलींचे दस्ताऐवज झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:35 IST