हिंगोली : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रपट निर्मित्तीच्या शताब्दी वर्षात आयोजित केलेल्या लघूपट व माहितीपट प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम्मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी होते. या प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, नंदककिशोर तोष्णीवाल, नायब तहसीलदार एस. एस. जैस्वाल, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. बर्वे, नगर परिषदेचे अभियंता पाटील, संस्कृती पिंगळकर, मंगेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. गोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले. गुरूवारी दिवसभरात नागरिक व विद्यार्थ्यांसाठी माहितीपत्र व लघूपट विनामूल्य दाखविण्यात आले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या लघूपट- माहितीपट महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
लघुपट-माहितीपट प्रदर्शन
By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST