शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

चोख सुरक्षेतील एमजीएम वसतिगृहात डॉक्टर विद्यार्थीनीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 6:59 PM

तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती.

औरंगाबाद: महात्मा गांधी मिशन (एमजीएम) कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास सिडको पोलिसांनी सुरू केला.

डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (रा. झेंडाचौक, पाटील गल्ली, माजलगाव, बीड) असे खून झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षा एमजीएमच्या  फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स आॅफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती.

सिडको पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकांक्षा ही एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये दोन विद्यार्थिनीसोबत राहत होती. तिच्या रूमपार्टनर तंत्रनिकेतन आणि इंजिनिअरींच्या विद्यार्थिनी असून त्यांची परीक्षा नुकतीच झाल्याने त्या गावी गेल्या होत्या. यामुळे तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती. मंगळवारी (दि.११) आकांक्षाला दिवसभर कोणीही तिला पाहिले नाही.

यामुळे रात्रपाळीच्या वसतिगृह सहप्रमुख ( वॉर्डन) एका मुलीला सोबत घेऊन आकांक्षाच्या खोलीत गेल्या. त्यावेळी त्यांना आकांक्षा खोलीत निपचित पडलेली दिसली. त्यांनी या घटनेची माहिती लगेच आकांक्षाचा चुलतभाऊ, एमजीएम नर्सिंगमधील प्राध्यापक डॉ. राहुल देशमुख आणि वसतिगृहप्रमुख प्रेरणा दळवी यांना कळविली. 

यानंतर आकांक्षाला एमजीएम अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रात्री साडेदहा वाजता आकांक्षाला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती माजलगाव येथे राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना आणि सिडको पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

खूनाचा गुन्हा नोंदवून तपास करणारयाविषयी बोलताना पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे म्हणाले की, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आकांक्षाचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.यामुळे हा खूनाचाच प्रकार असल्याने याप्रकरणी सरकारपक्षातर्फे खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे. - डॉ.राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २.