शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कारणे सांगायला बैठकीत येता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:49 IST

शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध विकासकामांना गती मिळावी म्हणून महापौर नंदकुमार घोडेले दर महिन्याला आढावा घेतात. मागील पाच बैठकांपासून अधिकारी निव्वळ कारणे दाखवून मोकळे होत आहेत. एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यापुढे बैठकांमध्ये कारणे सांगितली तर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.सोमवारी सकाळी महापौर दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सफारी पार्क, सातारा, देवळाई येथील पाण्यासाठी डीपीआर, ड्रेनेजचा डीपीआर, बाळासाहेब ठाकरे स्मारक, वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा आदी अनेक कामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे दाखविण्यास सुरुवात केली. सातारा, देवळाई भागात आणीबाणी कायद्याद्वारे निधी मंजूर करून तीन महिने झाले. आजपर्यंत दिवे लावण्यात आलेले नाहीत. आणीबाणीत निधी मंजूर करून देण्याचा अर्थ काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वॉर्डात फक्त रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांशिवाय अधिका-यांना दुसरे कामच नाही. पूर्वीप्रमाणे कचरा प्रश्न पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. आता कचºयाचा ताणही अधिका-यांवर राहिलेला नाही. सांगितलेली कामे का होत नाहीत. कामे करायचीच नाहीत, असे ठरविले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून यापुढे बैठकीला येताना कारणे अजिबात चालणार नाहीत, असा सज्जड दमही महापौरांनी भरला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या