शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यांची कागदपत्रे रोखू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:48 IST

Aurangabad High Court News : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत आहे

ठळक मुद्दे शैक्षणिक शुल्क न दिल्याचे कारण

औरंगाबाद : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय सर्वोपचार वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेल्या याचिकाकर्त्या शिक्षकांच्या पाल्यांच्या अंतर्वासिता कालावधीदरम्यान (इंटर्नशीप) त्यांना आवश्यक असलेले कोणतेही कागदपत्र केवळ शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी रोखू नयेत, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी बुधवारी दिला आहे.

गौरी स्वामी, सैयदा अजिज फातिमा, गौरव पांडे व इतर २१ एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी ॲड. शिवकुमार मठपती यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ज्या शिक्षकांच्या पाल्यांनी एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण केलेली आहे व ज्यांचा अंतर्वासिता कालावधी चालू आहे त्यांना १६ मार्च २०२१ चा सुधारित शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सुनावणी अंती खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आणि वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. शासनाच्यावतीने श्रीमती ॲड. एम.ए. देशपांडे यांनी काम पाहिले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलतशालेय शिक्षण विभागाच्या १९ ऑगस्ट १९९५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत अथवा स्थानिक संस्थेच्या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, शिक्षण मंडळे, जिल्हा परिषद आणि कटक मंडळ) शाळेत अथवा मान्यताप्राप्त व अनुदानित शाळेत कार्यरत असलेले पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पहिली ते पदव्यूत्तर स्तरावर नि:शुल्क शिक्षणाच्या सवलतीस पात्र समजण्यात यावे, अशी तरतूद आहे. राज्य शासनाने १६ मार्च २०२१ रोजी शासन निर्णयातील नि:शुल्क शब्दाऐवजी प्रमाणित फी पुरतीच शैक्षणिक सवलत देय राहील, असा बदल केला.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMedicalवैद्यकीय