लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड परिसरातील आनंदनगर येथील महिला चिमुकलीला घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. ७ दिवस उलटूनही महिलेचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलेच्या घरी महालक्ष्मीपूजनही झाले नव्हते.ललिता संदीप बिरंगणे (२२) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला पती व सासू-सासºयासोबत अहमदनगर जिल्ह्यातील नारायणगाव येथे काम करण्यासाठी गेले होते. परंतु लक्ष्मीपूजन असल्याने तिला पतीने २६ आॅगस्ट रोजी माहेरी सोडले होते. पती परत जाताच ललिता घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली. तर याच भागातील काही नागरिकांनी आॅटोमध्ये गेल्याचे महिलेच्या वडिलांना सांगितले. ७ दिवस उलटनूही महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही.महिलेचे आई-वडील दौंड, पुणे, अकोला, परळी येथे जाऊनही काहीच उपयोग झालेला नाही. तसेच पोलिसांनाही वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेपत्ता महिलेचा शोध लागेना; नातेवाईक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:46 IST