शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना निर्वाह भत्ता न देणे भोवले !

By admin | Updated: May 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळे येथील भिमाजी पाराजी गायकवाड यांनी ‘मुले निर्वाह भत्ता देत नाहीत’, अशी तक्रार उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती.

उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळे येथील भिमाजी पाराजी गायकवाड यांनी ‘मुले निर्वाह भत्ता देत नाहीत’, अशी तक्रार उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती. या तक्रारीची तातडीने दखल दोन्ही मुलांना पकडण्याचे वॉरंट बजाविण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दोघांनाही उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. निर्वाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने लेखी घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.तडवळे येथील भिमाजी गायकवाड यांनी महादेव गायकवाड व कृष्णा गायकवाड ही दोन्ही मुले संभाळत नसल्याने प्रशासनाकडे धाव घेवून निर्वाह भत्ता मिळावा, अशी मागणी केली होती. निर्वाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसे आदेश काढण्यात आले होते. भिमाजी गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार सुरूवातीचे दोन-तीन महिने दोन्ही मुलांनी नियमितपणे निर्वाह भत्ता दिला. परंतु, त्यानंतर भत्ता मिळाला नाही. मुलांकडे वारंवार मागणी करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे पुन्हा प्रशासनाकडे यावे लागले, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भिमाजी गायकवाड यांनी आपली व्यथाच उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोरही मांडली. याची गंभीर दखल घेत संबंधित दोन्ही मुलांना पकडण्याचे वॉरंट काढले. वॉरंटनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश बेंबळी ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. त्यानुसार सदरील दोन्ही मुलांना मंगळवारी उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद यांच्यासमोर हजर करण्यात आले. संबंधित दोघांकडूनही मार्च २०१५ ते एप्रिल २०१७ या कालावधीतील सुमारे ३९ हजार रूपये एवढा निवाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने लेखी घेवून त्यांना सोडून देण्यात आले.(प्रतिनिधी)