शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात कन्नौज अत्तराचे दर्दी; जागोजागी सुगंधी कट्टे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 10, 2024 11:20 IST

अजूनही अत्तर गल्लीत गेले की, पहिले कापसावर अत्तराचा थेंब टाकून (फाया) ग्राहकाला दिला जातो.

छत्रपती संभाजीनगर : सिटी चौकातील निजामकालीन अत्तर गल्लीत सुगंध दरवळतच आहे, पण आता शहरात जागोजागी सुगंधी कट्टे तयार झाले आहेत. वर्षभर अत्तर, स्प्रे विक्री होत असली तरी रमजान ईदमध्ये सुगंधी दरवळ जास्तच असते. मन प्रफुल्लित करणारे हे सुगंधी कट्टे आता शहराची नवीन ओळख बनले आहेत.

रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुस्लीम बांधव खरेदीच्या सर्वांत शेवटच्या टप्प्यात अत्तर आवर्जून खरेदी करतात. प्रत्येक जण न विसरता अत्तराची कुप्पी खरेदी करतोच. यामुळे रमजान ईदमध्ये सर्वाधिक अत्तर, स्प्रेची विक्री होत असते. अत्तराचे दर्दीसुद्धा शहरात अजून कायम आहेत. यामुळे अत्तर बाजारात बोटावर मोजण्याइतके सुगंधी कट्टे असले तरी दर्दींपर्यंत त्याचा सुगंध जाऊन पोहोचतोच. अत्तर गल्लीशिवाय शहरवासीयांना पर्याय नव्हता, पण मागील २० वर्षांत शहरातील प्रमुख बाजारपेठेत चौकात जागोजागी सुगंधी कट्टे निर्माण झाले आहेत. याशिवाय काही जण कार्यालयात, घरोघरी फिरूनही अत्तराची विक्री करीत आहेत. यामुळे अत्तर गल्लीचे महत्त्व कमी झाले आहे. नवीन पिढी आता अत्तरापेक्षा विविध कंपन्यांच्या स्प्रेला पसंती देत असल्याने सुगंधी कट्ट्यांना पसंती दिली जात आहे.

फाया देऊन स्वागतअजूनही अत्तर गल्लीत गेले की, पहिले कापसावर अत्तराचा थेंब टाकून (फाया) ग्राहकाला दिला जातो. स्वागताची ही परंपरा अजूनही कायम आहे. यामुळेच ही निजामकालीन सुगंधी गल्ली मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.

कन्नौज अत्तराचे दर्दीशहरात अत्तराचे दर्दी काही कमी नाहीत. ते सुगंधावरून अत्तर असली की कृत्रिम आहे हे ओळखतात. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील अत्तर खरेदी करणारा एक खास वर्ग आहे. यामुळे अत्तर है कन्नौजच्या नावाने विकले जाते, अशी माहिती अत्तर विक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार