पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीची मासिक सभा आज पंचवटीतील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. सकाळी अकरा वाजता पंचवटी प्रभाग समिती सभापती शालिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या महिला शहरअध्यक्ष सुनिता निमसे यांचे पती अशोक निमसे तसेच पंचवटीतील अन्य दिवंगतांना श्रद्धांजली वाहून प्रभाग सभा तहकूब करण्यात आली. सोमवारी तहकूब झालेली सभा उद्या (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता पुन्हा होणार आहे. यावेळी नगरसेवक सिंधू खोडे, सुनिता शिंदे, मनिषा हेकरे आदिंसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रभाग सभा तहकूब
By admin | Updated: May 27, 2014 01:10 IST