शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी

By admin | Updated: September 26, 2016 00:05 IST

उस्मानाबाद : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे़

उस्मानाबाद : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे़ तर ११ प्रकल्पात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक पाहता हे प्रकल्पही लवकरच भरण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यात ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला ंअसल्याने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. परतीच्या पावसाने मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे़ सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मागील चार-पाच वर्षापासून कोरडेठाक पडलेल्या प्रकल्पांमधील पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत होत आहे़ मागील चार-पाच दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१६ पैकी तब्बल ९१ प्रकल्प तुडूंब भरले असून, ११ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़ १८ प्रकल्पांध्ये ५१ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे़ तर १८ प्रकल्प २५ ते ५० टक्क्याच्या मध्ये आहेत़ ही परिस्थितीत आणि पावसाचा जोर पाहता पुढील काही दिवसात आणखी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे़ तुडूंब भरलेल्या प्रकल्पांमध्ये भूम तालुक्यातील रामगंगा, संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापूर, खंडेश्वर, साकत, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा, उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, बेन्नीतुरा या प्रकल्पांचा समावेश आहे़ तर लघू प्रकल्पांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, खामसवाडी, राघुचीवाडी ल़पा़, पोहनेर, वलगूड ला़प़, वलगूड सा़त़, कौडगाव, शेकापूर, भूम तालुक्यातील बागलवाडी, कुंथलगिरी, गोरमाळा, पाथ्रूड, जांब, हिवर्डा, गिरलगाव, घुलेवाडी, डुक्करवाडी, उमाचीवाडी, जांब सा़त़, वाशी तालुक्यातील सेलू, हातोला, परंडा तालुक्यातील सोनारी, अंबी, जेजला, मुगाव, तिंत्रज, वाटेफळ या प्रकल्पांचा समावेश आहे़ तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी, इटकळ, पळस निलेगाव, सिंदगाव, सलगरा मड्डी, मुरटा, हंगरगा, व्होर्टी सा़त़एक, खुदावाडी, तामलवाडी, सलगरा दिवटी, वाणेगाव, लोहगाव, नंदगाव, किलज, मुर्टा, धोत्री, जळकोट, आलीयाबाद, व्होर्टी सा़त़दोन, कसई (ना़), बंचाई, हंगरगा नळ, येडोळा, कुंभारी (कोरेवाडी), उमरगा तालुक्यातील कसमलवाडी, कोरेगाववाडी, अचलेर, कोळसूर, डिग्गी, केसरजवळगा, कुन्हाळी, अचलेर, भुसनी, गुंजोटी, कदेर, वागदरी, भिकार सांगवी, सुपतगा, पेठसांगवी, सरोडी, कालनिंबाळा, रामनगर, दगडधानोरा, कोरेगाव, बलसूर, कोराळ, एकूरगा, जेवळी सा़तक़्रमांक दोन, गुंजोटीवाडी, लोहारा तालुक्यातील धानुरी, लोहारा, जेवळी, मळेगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़ तर इतर ११ प्रकल्पही लवकरच भरतील, अशी आशा वर्तविण्यात येत आहे़ १० प्रकल्प कोरडे जिल्ह्यातील १० प्रकल्प अद्याप कोरडेठाक असून, २५ प्रकल्पात जोत्याखाली पाणी आहे़ तर ४३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे़ पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता या प्रकल्पातही पाण्याचा साठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ बोरीत ९० टक्के साठा तीर्थक्षेत्र तुळजापूरसह नळदुर्ग शहर व अणदूर गावाची तहान भागविणाऱ्या बोरी प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे शहरांसह गावाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे़ प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, येत्या एक-दोन दिवसात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरू होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, नळदुर्गसह अणदूर, सराटी, वागदरी, शहापूर, चिवरी, बाभळगाव, गुजनूर आदी गावासह परिसरातील जमिनी सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)