बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हास्तरीय दक्षता समिती व जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती बुधवारी जाहीर केली. या समितीत वर्णी लागण्यासाठी अनेकांनी ‘लॉबिंग’ केले होते. त्यामुळे निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात येते. पालकमंत्री पंकजा मुंडे स्वत: समितीच्या अध्यक्षा असून जिल्हाधिकारी उपाध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी सचिव असतात.समितीत यांची लागली वर्णी...आ. प्रा. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, अॅड. संगीता धसे (बीड), अॅड. संगीता सुखदेव चव्हाण (वडवणी) , धम्मानंद मुंडे (परळी), अजय सवई (बीड) , राजाभाऊ दहीवाळ (परळी), शिवाजीराव मुंडे (भोगलवाडी) यांचा समावेश आहे.आरोग्य समितीही गठीत...जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीत खासदार, आमदार तसेच नामांकित डॉक्टर्स यांचा समावेश आहे. अध्यक्ष - पालकमंत्री पंकजा मुंडे, सदस्य - खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. विवेक दंडे, डॉ. दीपक मुंडे (परळी), डॉ. अतुल देशपांडे (अंबाजोगाई), डॉ. लक्ष्मण जाधव (बीड), डॉ. आबेद महेमुद जमादार (गेवराई), डॉ. शैलजा गर्जे (आष्टी), डॉ. अरूणा नेहरकर (केज), डॉ. परमेश्वर बडे (वडवणी), डॉ. उध्दव नाईकनवरे (माजलगाव), नामनिर्देशित सदस्य म्हणून स्वप्नील गलधर, विक्रांत हजारी तर सार्वजनिक आरोग्य क्षेञात काम करणाऱ्या अशासकीय संस्था म्हणून स्व. सुवालाल वाकेकर सामाजिक प्रतिष्ठान व श्रीनाथ मानव सेवा मंडळ परळी यांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा दक्षता, आरोग्य सेवा समिती जाहीर
By admin | Updated: July 14, 2016 01:12 IST