जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यातून पोलिसांत वाद सुध्दा होत असल्याच्या घटना काही पोलिस ठाण्यात घडत असल्याचे चित्र आहे. अद्यापही ५९ पोलिसांची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख आहे. वाढत्या लोकसंख्येनमुळे गुन्ह्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दलात लोकसंख्येच्या मानाने पोलिसबळ कमी पडत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच एैरणीवर राहिला आहे. जिल्ह्यात शहरातील चार पोलिस ठाण्यासह १८ पोलिस ठाणे आहेत. त्यासाठी १७१० पोलिस कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. परंतु १६३८ पोलिस कर्मचारीच कर्तव्यावर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही कर्मचारी अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे रजेवर असतात. त्यामुळे अतिरीक्त कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. २०१४ - २०१६ मध्ये दोनदा पोलिस भरती घेण्यात आली.त्यातून १५९ नवीन पोलिस कर्मचारी मिळाले. अद्यापही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. अतिरीक्त कामाच्या कामामुळे पोलिसांना त्यांच्या कुंटुबाकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नसल्याचे चित्र आहे. अतिरीक्त कामाच्या तणावामुळे अनेकांना आजारांनी ग्रासले आहे. (प्रतिनिधी)
अपुऱ्या पोलिसांवर जिल्ह्याची सुरक्षा
By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST