शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘पुस्तक दिन’ साजरा

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व संस्थेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून ‘पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व संस्थेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून ‘पुस्तक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औसा : औसा तालुक्यातील खानापूर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत शासनाने घोषित केलेल्या पुस्तकदिनी शाळेतील सर्व मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश राठोड, गोविंद पवार, देवीदास चव्हाण, मुख्याध्यापक महादेव खिचडे, सहशिक्षक बलभीम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. औसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७५ शाळा, प्रशालेच्या सहा शाळा, खाजगी संस्थेच्या ५६ शाळा अशा एकूण १३७ शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील देवलाबाई पवार, स्तुताबाई चव्हाण, ढालाबाई चव्हाण, बुराबाई राठोड, लालूबाई चव्हाण, झिपाबाई चव्हाण यांच्यासह माता पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शालेय समितीचे अध्यक्ष उत्तम बिरादार, संदीपान बिरादार, प्रेमकुमार मानकेश्वर, मुख्याध्यापक एस.जी. पुठ्ठेवाड, व्ही.एन. दंतराव, टी.एम. पडोळे, बी.व्ही. सुगावे, टी.डी. बिरादार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच प्रारंभी गावातील मध्यवर्ती रस्त्यावरून प्रभातफेरी काढून ‘आपली मुले शाळेत पाठवा’ असे आवाहन करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचेही वाटप करण्यात आले. प्रवेश, स्वागताने सजली शाळा...औसा तालुक्यातील लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वहीद पटवारी, ग्रामपंचायत सदस्य मुबारक कारभारी, सिद्धाप्पा बनसोडे, भुजंग कुलकर्णी, तात्याराव कांबळे, गणपत बनसोडे, सुनीता बनसोडे आदींची उपस्थिती होती.प्रारंभी इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व पेन देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उपसभापती मुगळे यांनी शाळेतील विविध उपक्रमाची पाहणी करून मुख्याध्यापक सत्यनारायण वडे यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता साखरे यांनी केले.