शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

जिल्हाध्यक्षांना भाजपाकडून शह

By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंग येऊ लागला आहे. जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारीका पोकळे व भाऊ,गणेश पोकळे

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंग येऊ लागला आहे. जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारीका पोकळे व भाऊ,गणेश पोकळे यांनी पालकमंत्र्याच्या आदेशान्वये गुरुवारी अर्ज मागे घेतले. या प्रकारामुळे एका प्रकारे भाजपाने जिल्हाध्यक्षांनाच नाकारल्याची चर्चा आहे. आज, शुक्रवारी डीसीसी निवडणुकीसाठी भाजपाची अंतीम उमेदवारांची यादी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी १६२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. १८ एप्रिल पासून अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या पाच दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ येत असल्याने अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. मंगळवार पर्यंत एकुण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते तर गुरुवार पर्यंत हा आकडा २१ च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दुपारनंतर सदरील निवडणुकीच्या आखाड्यात कोण राहील याची व्युव्हरचना आखली जाईल. डीसीसीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस सुरुवातीपासून उदासीन दिसून आली.गुरुवारी पर्यंत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकी संदर्भात बैठक घेतली नाही. तर भाजपाने डीसीसी बँकेवर झेंडा लावण्याचा जणूृ पणच केला आहे. त्यामुळे डीसीसीच्या निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाने डीसीसी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरु केली असून या संदर्भात गुरुवारी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी, भाजपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेणार आहेत. यातून निवडणुकीची नेमकी स्थिती कळणार आहे.मतदान पाच मे रोजी होणार असून, मतमोजणी सात मे रोजी पार पडणार आहे. १९ जागांसाठी १६२ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर आता २१ अर्ज मागे घेतले गेले असल्याने एकूण १४१ अर्ज डीसीसी निवडणुकीसाठी पात्र आहेत.राष्ट्रवादीचा ‘मॅनेज’ गेमडीसीसी निवडणुकीसाठी राकाँचे उमेदवार फार उत्साही नाहीत. परंतु ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांचे अर्ज मागे घेण्यात येत आहेत. शेअरिंग करून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला एका अर्थी पाठबळ देत आहे काय ? असा संशय या निमित्ताने बळावला आहे.अर्जून सपंतराव बडे (कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था), अंगद सखाराम मुंडे, तुळसाबाई रामदास खाडे, दिलीप भानुदासराव करपे, लक्ष्मण महादू लटपटे, (इतर शेती संस्था), शितल दिनकरराव कदम, शोभा वसंतराव साबळे, उषा महादेव तोंडे, सत्यभामा रामकृष्ण बांगर, पार्वती बाबासाहेब तपसे, सारिका रमेश पोकळे (महिला प्रतिनिधी), धनराज राजाभाऊ मुंडे, नितीन जीवराव ढाकणे (विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग), गणेश शिवदास पोकळे, संजय भिमराव सानप, निळकंठ भगवान भोसले, विश्वांभबर जनार्दनराव थावरे, मनोज बद्रीनाथ साबळे, व्यंकट माधवराव कराड, वसंतराव आप्पासाहेब आगळे, अविनाश बन्सीधर लोमटे (प्राथमिक, कृषी, पतपुरवठा, धान्य अधिकोष सहकारी संस्था)