शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सुरक्षिततेत जिल्हा रुग्णालय ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:03 IST

बीड : जिल्हा रूग्णालयात शनिवारी रात्री मद्यपी रूग्ण बेडवरच धिंगाणा करू लागला

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मला सर्दी झाली आहे, खोकला थोडाच येत आहे, असे म्हणून एक मद्यपी रूग्ण जिल्हा रूग्णालयात शनिवारी रात्री १.२३ च्या सुमारास दाखल झाला. डॉक्टरांनी त्याच्यावर तत्कालीक विभागात उपचार सुरू केले. याचवेळी संबंधित मद्यपी रूग्ण बेडवरच धिंगाणा करू लागला. सोबतचे तीन-चार साथीदारही त्याला साथ देत होते. या विभागातील हा ‘गटारी गोंधळ’ बंद करण्यास मात्र कोणीच समोर आले नाही. यावरून रूग्णालय सुुरक्षिततेच्या बाबतीत ‘आजारी’ असून त्यावर उपाययोजनांचे ‘उपचार’ करण्याची गरज असल्याचे दिसून आले. ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षिततेअभावी डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य रूग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे.जिल्हा रूग्णालयात चांगले उपचार मिळतात. अपुरे डॉक्टर, कर्मचारी असले तरी रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे जिल्हा रूग्णालये अनेक बाबींमध्ये राज्यात प्रथम आहे. रक्त संकलण, तांबी बसविणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कुपोषित बालकांवर उपचार यासारख्या गोष्टींमध्ये रूग्णालय अव्वल आहे. परंतु काही ठराविक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा रूग्णालय बदनाम होत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्य रूग्णांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.३२० खाटांच्या असणाऱ्या जिल्हा रूग्णालयात दररोज दोन हजाराच्या जवळपास बाह्य रूग्ण तपासणी होते. तसेच अ‍ॅडमिट असणाऱ्या रूग्णांची संख्या ७०० ते ८०० च्या जवळपास असते. तरीही रूग्णांना सेवा देण्यात अपवादात्मक प्रकार सोडले तर तत्परता असल्याचे दिसून येते. परंतु याच डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. सुरक्षा रक्षक, कर्मचारी रात्रीच्यावेळी मद्यपी रूग्णांपासून दुरच दोन हात लांब राहूनच सेवा देत असल्याचेही दिसून आले.दरम्यान, शनिवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार घडला. एका मद्यपी रूग्णाला केवळ सर्दी झाली होती. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. गरज नसतानाही तो सलाईन लावण्याचा हट्ट धरू लागला. डॉक्टरांनी त्याला समजावण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु त्याने त्यांचे ऐकले नाही. सोबत असणारे आणखी तिघांनी यामध्ये आणखीणच भर टाकली. रूग्णाला सलाईन लावली अन् डॉक्टर दुसऱ्या रूग्णाकडे निघून गेले. याचवेळी सोबतच्या मद्यपींनी रूममध्येच धिंगाणा सुरू केला. मद्यपी रूग्णासोबत ते वाद घालत होते. अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत होते. एका सुशिक्षित व्यक्तीला त्यांनी एकेरी भाषा वापरून वाद घालण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा धिंगाणा झाल्यानंतर सोबतचे तिघे निघून गेले. मद्यपी रूग्णांने शौचास जाण्याचे कारण सांगून डॉक्टरांकडून सलाईन काढली. त्यानंतर तो सलाईन न लावताच निघून गेले. लावायची असेल तर सलाईन मी घरी घेऊन जातो, असा हट्ट डॉक्टरांकडे करीत असल्याचेही पहावयास मिळाले. हा सर्व प्रकार घडत असताना डॉक्टर व परिचारीकेशिवाय एकही पुरूष कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक इकडे फिरकला नाही, हे विशेष.