शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

जिल्हाध्यपदाची माळ आमदाराच्या गळ्यात

By admin | Updated: January 12, 2016 23:44 IST

हिंगोली : रडत-पडत, रखडत-अडखळत भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सायंकाळी पाचच्या सुमारा पार पडली.

हिंगोली : रडत-पडत, रखडत-अडखळत भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सायंकाळी पाचच्या सुमारा पार पडली. अंतर्गत वाद वाढत गेले अन् त्याचा फायदा आमदार तान्हाजी मुटकुळे यांना झाला. अनपेक्षितपणे जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. कधी कार्यकर्ता शोधावा लागणाऱ्या या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी तब्बल ४३ इच्छुकांनी अर्ज केला होता. त्यामुळे मुलाखती घेत असलेल्या निवडणूक अधिकारी मनोज पांगरकर यांना ही बाब प्रचंड अवघड जात होती. त्यात अनेकांना समजावले. तेव्हा माघारी घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले. तरीही १९ जण शर्यतीत उरले होते. त्यानंतर पुन्हा दुसरी फेरी सुरू झाली. यापैकी कुणीही ऐकायला तयार नव्हता. मात्र आमदार तान्हाजी मुटकुळे यांना जिल्हाध्यक्ष करीत असल्यास शिवदास बोड्डेवार, सुरजितसिंह ठाकूर, फुलाजी शिंदे, सूर्यभान ढेंगळे, उमेश गुट्टे, गोवर्धनअण्णा विरकुंवर, पी. आर. देशमुख यांनी माघारीची तयारी दर्शविली. मात्र इतर कुणी असल्यास आम्ही समोरील प्रक्रियेसाठी तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रक्रियेबाबत पांडुरंग पाटील, श्रीकांत देशपांडे, अ‍ॅड.प्रभाकर भाकरे यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पांगरकरही गोंधळून गेले. शेवटी त्यांनी ही बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ते जिकडे-तिकडे जाण्याची तयारी सुरू झाली असतानाच दहा ते पंधरा मिनिटांनी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीनंतर काही वेळातच आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे नाव जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. या अनपेक्षित प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला. खरेतर त्यांना हा निर्णय पचत नसला तरी चेहऱ्यावर उसने अवसान आणत त्यांनी घडल्या प्रकारातही आनंद मानला. काहींचा आनंद तर ‘... सवत रंडकी...’ या प्रकारात मोडणारा होता. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आमदारांचे स्वागत केले. मावळते जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, ब्रीजलाल खुराणा बी. डी. बांगर, के. के. शिंदे, शंकर बोरुडे, गणेश बांगर, मिलिंंद यंबल आदी मंचावर होते. तर सूर्यभान ढेंगळे, रामरतन शिंदे, संजय कावडे, संजय खंडेलवाल, रवीकुमार कान्हेड, उमेश नागरे आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)