शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक

By सुमित डोळे | Updated: August 31, 2023 11:55 IST

न्यायालयाने सुनांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला, आरोपी मुलगा सुनील, नामदेव कचकुरेला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेणार

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ काेटींच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५७) याला एसआयटीने बुधवारी सायंकाळी अटक केली. दोन दिवस चौकशीला बोलावून एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे न दिल्याने एसआयटीने अखेर त्याला आरोपी करत अटक करण्याचा निर्णय घेतला.

११ जुलै रोजी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अंबादास मानकापे, त्याचा मुलगा अनिल, संचालक सहकारी, सुना, मुख्य व्यवस्थापक देवीदास आधानेची पत्नीसह १२ आरोपींना अटक करण्यात आली. जवळपास १५० कोटींच्या संपत्तीची माहिती काढण्यात आली. मात्र, सात वर्षे हा घोटाळा होत सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मात्र नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते. एसआयटीचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दोन दिवसांपूर्वी खरेला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही.

दिवसभर अनुत्तरित, दिले तेही अपूर्णखरेवर दिवसभर एसआयटीने प्रश्नांची सरबत्ती केली. २०१६ ते २०१९ मध्ये पदभार असतानाच त्याच्याकडे पतसंस्थेच्या अनियमित कारभाराविषयी अहवाल सादर झाला होता. मात्र, तो तुम्ही बाजूला का ठेवला, त्याकडे दुर्लक्ष का केले, कारवाई का केली नाही, असे प्रश्न विचारताच खरे शांत झाला. वारंवार प्रश्न विचारूनही असहकार्य करत असल्याने अखेर पोलिसांनी तत्काळ आरोपी करण्याचा निर्णय घेत अटक केली. त्याच्याशी सर्व कचकुरे व सुनील सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता तिघांची समोरासमोर चौकशीसाठी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांना पुन्हा गुरुवारी पाेलिस कोठडीत घेतले जाणार आहे. न्यायालयाने बुधवारी पोलिसांची मागणी मान्य केली.

सुनांचा जामीन फेटाळलाआतापर्यंत बाराच्या जवळपास आरोपींना अटक झाली असून त्यातील अनेकांनी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे सुरू केले आहे. त्यापैकी सून सुनंदा अनिल पाटील (५०) व वनिता सुनील पाटील (४२) यांना जामीन विशेष न्यायालयाने फेटाळल्याचे पवार यांनी सांगितले.

अनेक अधिकारी पसारखरेला अटक होताच जिल्हा उपनिबंधक कार्यालय हादरले आहे. पहिल्यांदाच एसआयटीने अधिकाऱ्याला अटक केल्याने तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अटकेच्या भीतीने वकिलाचा शोधाशोध सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद