हिंगोली : यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा २५ मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्याने २०० मिमी सरासरीचा टप्पा ओलांडला. गतवर्षी पोळ्याला सव्वा नऊशे मिमी पाऊस झाला होता. आज तेवढा पाऊस नसला तरी पोळ्याच्या दिवशी दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे़ १६ आॅगस्ट रोजी निघालेले मघा नक्षत्र पाऊस घेवून आले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले तरी तहान भागलेली नाही. ओलीला ओल गेली नसल्याने भरपूर पाण्याची गरज आहे. २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ५ मिमी पाऊस झाला. औंढा नागनाथ वगळता सर्व तालुक्यात पाऊस झाला होता. २० आॅगस्टला पावसाने हजेरी तेवढी लावली. २१ आॅगस्टला ५.२७ मिमी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. औंढा आणि कळमनुरी तालुक्यात अनुक्रमे १० मिमी पाऊस झाला. २२ आॅगस्ट रोजी सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यात २१ आणि ८ मिमी पाऊस झाला. पोळ्याच्या आदल्या दिवशी ५ पाऊस झाला. सोमवारी सकाळी कडक ऊन पडले होते. दुपारी जिल्हाभरात उत्साहात पोळा साजरा झाला. सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रात्रीला तापमान घटताच दमदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: जिल्हाभरात हा पाऊस होता. हिंगोली रात्री ९ वाजल्यापासून अर्धातास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औंढा तालुक्यात ६१ मिमी पाऊस झाला. ५० मिमीच्या पूढे पाऊस झाल्याची पहिलीच वेळ असून आता ३०६ मिमीवर औंढ्याची सरासरी गेली. सेनगावातही २३ मिमी पाऊस झाला. पहिल्यांदा २० मिमीच्या पुढे पाऊस झाल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्याने ओलांडला २०० मिमीचा टप्पा
By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST