शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विद्यार्थिनी वसतिगृहांत दूषित पाणीपुरवठा; मुलींना जुलाब, उलट्यांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे २५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू असून, संतप्त विद्यार्थिनींनी कुलगुरूंचे दालन गाठत कुलगुरू, प्रकुलगुरूंना घेराव घालत जाब विचारला.

ठळक मुद्देविद्यापीठ : कुलगुरू, प्रकुलगुरूंना घेराव; कुलसचिवांचा बेफिकीरपणा उघड

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे २५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू असून, संतप्त विद्यार्थिनींनी कुलगुरूंचे दालन गाठत कुलगुरू, प्रकुलगुरूंना घेराव घालत जाब विचारला. तेव्हा दोन्ही अधिकाऱ्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले. मात्र सायंकाळपर्यंत याविषयी कोणतीही पावले उचलण्यात आली नव्हती.विद्यापीठात विद्यार्थिनींची पाच वसतिगृहे आहेत. यापैकी तीन वसतिगृहांमध्ये शहरातील नाल्यांच्या जवळील विहिरीतून टँकरद्वारे दोन दिवस दूषित पाणीपुरवठा करण्यात आला. या पाण्याचा वास येत होता. हे पाणी पिल्यामुळे रविवारपासून विद्यार्थिनींना जुलाब, उलट्या, मळमळ सुरू होती. यातील बहुतांश विद्यार्थिनींनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेऊन खाजगी दवाखान्यात उर्वरित उपचार घेतल्याची माहिती विद्यार्थिनी दीक्षा पवार हिने ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोन दिवस दूषित पाणीपुरवठा होत असतानाही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे, प्रशासकीय प्रमुख कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी वसतिगृहांना भेट दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी कुलगुरूंच्या दालनात त्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची उपस्थिती होती. प्रकुलगुरूंनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. या कर्मचाºयांकडून माहिती घेतली असता, त्यांनी दोन दिवसांपासून स्वच्छतागृहात वापरण्याचे पाणी पिण्याच्या टाक्यांमध्ये टाकले असल्याची कबुली दिली, तसेच हे पाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राऐवजी खाजगी विहिरीवरून आणले असल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हा कुलगुरूंनी तात्काळ पाण्याची समस्या सोडविण्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी दीक्षा पवार, पूजा सोनवणे, सुषमा भगत, दीपक बहिर, अजय पवार, सचिन बोराडे, पांडुरंग नखाते, दिगंबर जाधव, स्वप्नील काळे, रमेश कळंबे, परमेश्वर काष्टे, दादाराव कांबळे, पवन राजपूत यांच्यासह वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छुट्टीयो मे रहने के लिये ए बनाव : कुलसचिवविद्यापीठातील स्थावर विभागाच्या प्रमुख या नात्याने कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेतली असता, त्यांनी याप्रकरणी बेफिकीरपणाचा कळस गाठला. यावेळी कुलसचिव म्हणाल्या, ‘पाणी की समस्या तो जगभर मे हैं, बच्चिया बिमार हुई तो क्या हुआ. पाणी की वजह से बिमार हुए ये कोण बता सकता हैं, बिमार होने की दुसरी वजह भी हो सकती हैं. बच्चियो को छुट्टीयो में होस्टेल मे रहने का हैं, इसलिए ए आरोप कर रही होगी.’ असे धक्कादायक उत्तर दिले. आपण चुकीचे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव करीत दूषित पाणीपुरवठा करणाºयांची चौकशी केली जाईल, तसेच सर्व टाक्यांची स्वच्छता केली असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच अभ्यासिकेत ३९ विद्यार्थी उपस्थित असल्याची नोंदणी करतात, त्याठिकाणी ८ हजार लिटर पाणी दिले तरी पुरत नाही. तेव्हा पाणीपुरवठा कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.प्रशासकीय इमारतीसह अनेक विभागात पाण्याचा ठणठणाटविद्यापीठात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शनिवारपासून भटकंती करावी लागत आहे. सोमवारी दिवसभर विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, अभ्यासिकेत पाणी नसल्याने पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या सतत तक्रारी सुरू होत्या. सगळीकडे भटकंती करूनही पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बाटलीभर पाण्यासाठी बेगमपुºयातील मित्रांच्या खोल्या गाठाव्या लागत होत्या. विद्यापीठ परिसरात सर्वत्र विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या दिसून येत होत्या. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य