शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वाळूज महानगरात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:11 IST

मागील आठवडाभरापासून सिडको वाळूज महानगरातील अनेक नागरी वसाहतींत नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत आहे.

वाळूज महानगर : मागील आठवडाभरापासून सिडको वाळूज महानगरातील अनेक नागरी वसाहतींत नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत आहे. दूषित पाण्यमुळे साथीच्या आजाराची लागण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

सिडको प्रशासन एमआयडीसीकडून पाणी विकत घेवून महानगरातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करते. परंतू सिडकोच्या पाणीपुरवठा करणाऱ्या अंतर्गत जलवाहिनीला व वॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. हेच घाण पाणी पुन्हा जलवाहिनीत मिसळत आहे. त्यामुळे सिडकोतील स्वामी विवेकांनदनगर, स्वामी समर्थ हौ. सोसायटी, साई सहवास हौ. सोसायटी, साक्षीनगर, देवगिरीनगर, साईनगर, जिजामाता नगर आदी भागातील नागरिकांच्या नळाला माती मिश्रीत गढूळ पिवळसर रंगाचे पाणी येत आहे. मागील आठवडाभरापासून हा प्रकार सुरु असून, मंगळवारी पुन्हा नळाला दूषित पाणी आले.

दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांना गॅस्ट्रो, कावीळ, पोटदुखी, जुलाब व त्वचेचे साथीचे आजार जडत आहेत. साथीच्या आजाराने लहान मुले आजारी पडत आहेत. प्रशासनाने जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम करुन शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.या विषयी सिडकोचे अभियंता दीपक हिवाळे म्हणाले की, एमआयडीसीकडूनच दूषित पाणी येत आहे. सिडकोकडे स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र नाही. तरीही येणाऱ्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWalujवाळूज