शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर तालुक्यात पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:27 IST

तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांत निर्जळी : सरपंच संघटना काढणार हंडा मोर्चा, नियमबाह्य कार्यवाहीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, विज वितरणने आडमुठी भुमिका स्विकारून तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठयाचे कनेक्शन गेल्या चार पाच महिन्यांपासून नियमबाह्यरित्या बंद केले आहेत़ या संघटनेचे अध्यक्ष राम पाटील यांनी १५ फेब्रुवारीला माहिती अधिकाराखाली लेखी जाब विचारला असता महावितरण खडबडून जागे होऊन सर्व ग्रामपंचायतींना लेखी नोटीस देवून मागील २० ते २५ वर्षांपासूनची थकीत बिले एकदाच भरण्याचा आग्रह करत आहेत़ मागील २० वर्षांपासून एकदाही ग्राम पंचायतीला नोटीस बजावलेली नाही किंवा वीज पुरवठा खंडीत केला नाही़ त्यामुळे १ ते २० लाखांपर्यंत वीज बिल थक लेली आहेत. एकही ग्रा.पं.ला विद्युत मिटर बसविलेले नाही. मागील चार पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात विहीर अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला. त्याही काळातले विज बिल आकारले यापूर्वी एकदाही लेखी नोटीस दिली नाही किंवा विज पुरवठा खंडीत केला नाही त्यामुळे मागील थकीत बिले एकदम भरू शकत नाही. तालुक्यातील चार-पाच ग्राप वगळता अन्य ग्रापला उत्पन्नाचे साधन नाही. चालु बिले स्विकारून वीज कनेक्शन ८ दिवसांत सुरळीत करण्याचे आदेश द्यावे नसता महिलांचा हंडा मोर्चा काढुन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून जिल्हाधिकाºयांना दिला आहे. या निवेदनावर राम पाटील, प्रकाश कदम, इंदुमती गिते, दिपीका मोरे, नंदा मिसाळ, अंकुश ओळेकर, कडोस यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच स्वाक्षºया आहेत़