शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार लोकप्रतिनिधीची अपात्रता सहा वर्षांनंतर आपोआप संपुष्टात येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:32 IST

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविले असेल तर त्यांची अपात्रता सहा वर्षांसाठीच असते. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार एखाद्या पदाधिकाऱ्याची अपात्रता शासनाने रद्द केली नसली तरी सहा वर्षांनंतर ती आपोआप संपुष्टात येते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. सुनील कोतवाल यांनी दिला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

औरंगाबाद : लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविले असेल तर त्यांची अपात्रता सहा वर्षांसाठीच असते. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार एखाद्या पदाधिकाऱ्याची अपात्रता शासनाने रद्द केली नसली तरी सहा वर्षांनंतर ती आपोआप संपुष्टात येते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. सुनील कोतवाल यांनी दिला आहे.खुनाच्या आरोपाखाली तब्बल २२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून आलेले बळीराम तोताराम सोनवणे यांची अपात्रता शासनाने मागे घेतली नव्हती. निवडून येताना ते अपात्रच होते, असा दावा करणाºया याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून आलेले बळीराम तोताराम सोनवणे यांच्या निवडणुकीपूर्वी सरकारने त्यांची अपात्रता रद्द केली नव्हती. त्यामुळे निवडणूक लढविताना सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ नुसार अपात्रच होते, असा आक्षेप घेणारी याचिका जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक शांताराम सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार लोकप्रतिनिधीची अपात्रता सहा वर्षांसाठी असते. त्यानंतर ती आपोआप रद्द होते, याचा सर्वंकष विचार खंडपीठाने केला. शिक्षा भोगून आल्यानंतर संबंधिताला संपूर्ण जीवनभर अपात्र ठरविता येत नाही. कारण शिक्षा भोगल्यानंतर ठराविक अपात्रतेच्या काळात त्याला कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिलेली असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या कलम ४१ मधील तरतूद ही खाजगी जीवनातील स्वतंत्रता म्हणजे राज्यघटनेच्या कलम १४ आणि २१ चा भंग करणारी आहे, असे स्पष्ट निरीक्षण खंडपीठाने नोंदविले. तसेच अपात्रता रद्द करणे किंवा न करणे ही बाब राजकारणी लोकांच्या मर्जीवर सोडता येणार नाही.म्हणून केंद्रीय कायद्यातील तरतूद, सुधारण्याची संधी, खाजगी जीवन आणि राज्यघटनेच्या कलम १३ आणि २१ चा विचार करून यापुढे कलम ४१ नुसार एखाद्याची अपात्रता सरकारने मागे घेतली नसली तरी ती सहा वर्षांनंतर आपोआप संपुष्टात येईल, असा निर्वाळा खंडपीठाने दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. एन. नागरगोजे, सोनवणे यांच्यातर्फे अ‍ॅड. भरत वर्मा आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद