शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

डीपीसीच्या निधीवरून खैरे, सावंत यांच्यात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:36 IST

जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपावरून शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यात वाद सुरू झाल्याची चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपावरून शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यात वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना दिलेला निधी रद्द करून तो खा. खैरेंच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना देण्यात यावा, अशी मागणी डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आल्यामुळे त्यांनी औरंगाबादेत येण्याचे टाळण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. शिवाय पालकमंत्री पदावरही त्यांची काम करण्याची इच्छा नसल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटातून ऐकण्यास मिळत आहे.निधी वाटपाच्या पत्रावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या स्वीय सहायकाला खा. खैरे गटाकडून अरेरावीची भाषा वापरली गेल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री विमानतळावर शहीद किरण थोरात यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. ते विमानतळातून बाहेर न येताच तसेच परतणार होते. त्यामागे डीपीसी निधी वाटपावरून झालेल्या खडाजंगीचे कारण होते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटातून कानावर आली आहे. जानेवारी महिन्यात शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पालकमंत्री पदावरून हटविण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांना संधी देण्यात आली. तीन महिन्यांतच सावंत यांना येथील गटबाजीचा अनुभव आला आहे. कदम पक्षाचे नेते आहेत व त्यांनी दिलेली कामे ही आपल्याच कार्यकर्त्यांकडे आहेत, त्यामुळे पुढील नियोजनात काम वाटप करताना नवीन कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, असे सावंतांनी खा. खैरे यांना समजावल्यामुळे खैरेंना त्यांचा प्रचंड राग आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेguardian ministerपालक मंत्री