शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्यात दोन समुदायांत वाद, दगडफेकीनंतर तणाव

By बापू सोळुंके | Updated: March 13, 2024 04:34 IST

कडक बंदोबस्त : पोलिसांचा सौम्य लाठीमार, दुकाने बंद

बापू सोळुंके/सुमित डोळे, छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे मंगळवारी रात्री एका टोळक्याने मंदिरात जाऊन आरती बंद करण्याचे सांगितल्यानंतर झालेल्या वादानंतर एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच दोन भिन्न धर्मीय समाजांचे दोन गट आमनेसामने रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. एका बाजूने दगडफेकीचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.

चिकलठाणा येथील दोन भिन्न धर्मांची प्रार्थनास्थळे जवळजवळ आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या महिला मंदिरात आरती करीत असताना दुसऱ्या समुदायाचे काही तरूण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी राजू रोटे, कृष्णा नागे यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले. तसेच गुप्ता नावाच्या महिलेलाही यावेळी समुदायातील लोकांनी धक्काबुक्की केल्याने ती जखमी झाल्याचे कळते. परिसरातील दोन्ही समुदायांचे जमाव रस्त्यावर समोरासमोर आले. दोन्ही गट परस्परविरोधी घाेषणा देत होते. तणाव निर्माण झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नवनीत काँवत, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गौतम पातारे, संदीप गुरमे, राजेश यादव यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, एसआरपीचे जवान आणि अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी सर्वप्रथम जमावावर सौम्य लाठीमार केला. मग रस्त्यावरील जमाव गावातील गल्ल्यांमध्ये गेला. यानंतर काही गल्ल्यांत प्रत्येकी १० पोलीस आणि एक फौजदार तैनात करण्यात आले. गल्लीतील लोकांना आपापल्या घरातून बाहेर न पडण्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणाला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेऊन त्याची तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दीड वर्षापासून धुसफूस

चिकलठाणा येथील दोन्ही धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून उभय समुदायांतील तरुणांमध्ये धुसफूस सुरू आहे. दीड वर्षापूर्वी यावरून भांडण झाले होते. मात्र गावांतील ज्येष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतली होती. आता रमजान महिन्याच्या पहिल्याच रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला.      

चिकलठाणा मिनी घाटीजवळ शनिवारी रात्री दोन गटामध्ये उद्रेक झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. चिकलठाणा येथे शांतता आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत जे लोक सहभागी होते त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. सोशल मिडियावरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आपले सर्व नागरीकांना आवाहन आहे.- नवनीत काँवत, पोलीस उपायुक्त. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchikhalthanaचिखलठाणा