शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृउबाचे संचालक मंडळ होणार बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:23 IST

ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा मिळणाऱ्या बाजार समितीतील लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त केले जाईल.

ठळक मुद्देराष्ट्रीय दर्जा मिळणार : बाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ, निवडणूक बंद

औरंगाबाद : ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा मिळणाऱ्या बाजार समितीतील लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त केले जाईल. त्याऐवजी राज्य शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाचा ‘राज’ सुरूहोईल.शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाच्या असणाºया बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणाºया सुधारणा कायद्याला राज्यपालांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर व लातूर येथील बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समिती म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. यातील मुंबई, पुणे व नागपूर या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळे नाहीत तेथे प्रशासक आहेत. यामुळे या बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्तीचा मुद्दा उपस्थित होत नाही. औरंगाबादेतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिल्या टप्प्यात समावेश नाही; पण येथे ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतीमाल मध्यप्रदेश,राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, काश्मीर, केरळ या राज्यांतून येतो. यामुळे येत्या काळात या बाजार समितीलाही राष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकतो. येथील लोकनियुक्त संचालक मंडळाचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आणखी २ वर्षांचा कालावधी बाकी आहे. सध्या भाजपची सत्ता बाजार समितीवर आहे. मात्र, राष्ट्रीय दर्जा मिळाला तर संपूर्ण लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त होईल व प्रशासकीय मंडळाच्या हाती कारभार येऊ शकतो. एवढेच नव्हे तर सहनिबंधक दर्जाच्या अधिकाºयाला बाजार समितीचे सचिवपद मिळू शकते.(जोड)हमाल-मापाड्यांवर अन्यायराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्यांवर राज्य शासन प्रशासकीय मंडळ नेमणार आहे. यात समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी, ८ शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मात्र, हमाल-मापाडीच्या एका प्रतिनिधीला यातून वगळण्यात आले आहे. पूर्वी संचालक मंडळात ३ व्यापारी प्रतिनिधी असत. याविरोधात हमाल-मापाडी महामंडळ, लेबर युनियनने दीर्घकाळ आंदोलन करून ३ ऐवजी २ व्यापारी व १ हमाल-मापाडी प्रतिनिधी घेण्यास शासनाला भाग पाडले होते. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या बाजार समित्यांमधून आता हमाल-मापाड्यांच्या प्रतिनिधीला डावलण्यात येत आहे. हा अन्याय होय. या विरोधात लवकरच आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.सुभाष लोमटेसरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळ--८० टक्के आवक परपेठ, परराज्यातूनजाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र तालुक्यापुरतेच मर्यादित आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन औद्योगिक क्षेत्रात गेली आहे. परिणामी, शेतीमालाची आवक घटली. बाजार समितीत येणारा ८० टक्के शेतीमाल परजिल्ह्यातून व परराज्यातूनच येत आहे.हरिश पवारअडत व्यापारी

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबाद