शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

रोगराईचे दुष्टचक्र

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

रमेश शिंदे , औसा मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़

रमेश शिंदे , औसामृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़ लांबलेला पाऊस आणि दररोज होणाऱ्या नवनवीन रोगांच्या प्रादुर्भावामुळे औसा तालुक्यातील उटी बु़ व परिसरातील शेतकरी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेण्याऐवजी चक्क बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत. उटी बु़ लखनगाव या परिसरात तावरजा नदी वाहते़ या तावरजा नदीवरच उटी बु़ गावानजीक तावरजा मध्यम प्रकलप आहे़ या प्रकल्पातील पाण्यामुळे परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे़ उसासह भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पन्न घेऊन शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ करीत असल्याचे दिसून येत होता पण; मागील चार-पाच वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तावरजा मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. या उन्हाळ्यात तर तो कोरडा पडला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही काही प्रमाणात मोडीत काढावे लागले़ यावर्षी काही प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे तसेच पावसाळा लवकर सुरु होईल़ या आशेपोटी शेतकऱ्यांनी ऊस आणि भाजीपाल्याची लागवड केली़ पण आता विहिरीही कोरड्या पडल्या आणि पाऊसही नाही़ त्यामुळे ऊस वाळत आहे़ तर पाणी नसल्याने भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे बाजारातही या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. काही भाज्या तर विक्रीलायकही राहात नाहीत. त्यामुळे शेतकरी भाजीपाला उपटून बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत.शेतकऱ्यांचे मोठे नुकसाऩ़़उटी बु़ येथील शेतकरी रामकृष्ण जाधव यांनी २ एकर उसाची लागवड केली़ यामध्ये अंतरपीक म्हणून पत्ताकोबीची लागवड केली़ यासाठी ३५ ते ४० हजार रूपये खर्च केले़ परंतु, मृगाच्या प्रारंभीच विहिरीत पाणी नसल्याने ऊस वाळत आहे़ तर कोबीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ते काढून बांधावर टाकावे लागत आहे़ काहीतरी उत्पन्न हाती पडेल म्हणून लावलेल्या या भाजीपाल्याला पदरमोड करून रानाच्या बाहेर काढावे लागत असल्याने या दुहेरी चक्रातून शेतकरी सावरणार कसा, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली़