शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

वृक्ष संगोपनाच्या 'बिहार पॅटर्न'ची चर्चा; गरीब कुटुंबांच्या मदतीने गाव बनले 'ऑक्सिजन हब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 17:44 IST

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे वृक्ष संगोपणासाठी राबविण्यात आला बिहार पॅटर्न

औरंगाबाद : वृक्षारोपणात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु, त्यापैकी किती झाडे जगतात हा खरा संशोधनाचा प्रश्न. पण, आता राज्य सरकारने यावर मार्ग शोधला आहे, तो बिहार पॅटर्नचा! सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्ष संगोपनासाठी प्रथमच हा पॅटर्न राबविण्यात येत आहे. या पॅटर्नच्या यशाने अत्यंत कमी काळात गाव ऑक्सिजन हब बनले आहे. 

झाडे लावण्याबरोबर त्याचे संगोपन, संरक्षण करण्याची मोहीम 'मनरेगा'अंतर्गत राबवायची. त्यामुळे नागरिकांना हाताला कामही मिळेल आणि झाडेही जगतील. राज्यातील काही जिल्ह्यात हा प्रयोग राबविल्याने काही गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे 'बिहार पॅटर्न' यशस्वी होताना दिसतो.  सिल्लोड तालु्यात हा पॅटर्न राबवणारे  पिंपळगाव पेठ पाहिले गाव आहे. पिंळगावच्या स्मशानभूमी परिसरातपहिल्या टप्यात २०० झाडे लावण्यात आली आहेत. तर दोन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत ३००० हजार झाडे लावण्यात आली होती, ती १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. गावकऱ्यांनी वेळेवर पाण्याची बचत व झाडांचे संगोपन केल्यामुळे ही झाडे जगली. गावातील विविध क्षेत्रातील व गावकऱ्यांच्या वतीने झाडे लावण्यात आली आहे. 

असा आहे 'बिहार पॅटर्न''बिहार पॅटर्न'अंतर्गत गावाच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते. ग्रामपंचायतीमार्फत मनरेगांतर्गत गरीब कुटुंबांना काम देण्यात येते. मनरेगांतर्गत पहिले १०० दिवस २०० झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला दरमहा सहा हजार ७५ रुपयांची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते.  सन २०१९-२० मध्ये सामाजिक वनीकरण विभागांतर्गत विविध प्रकारची ३ हजार झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांचे योग्य नियोजन व संगोपन केल्यामुळे आज ती झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली आहेत. 

गाव बनले ऑक्सिजन हब या उपक्रमामुळे पिंपळगाव पेठ परिसरात अत्यंत शुद्ध असे वातावरण निर्माण झाले आहे. गाव प्रकारे ऑक्सिजन हब बनले आहे. यामुळे गाव परिसरात पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे, अशा प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण