शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार

By विजय सरवदे | Updated: February 23, 2024 17:22 IST

महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे.

विजय सरवदे, छत्रपती संभाजीनगर : महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, विरोधक अभ्यास न करता उगीचच गैरसमज पसरवत आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांस उपस्थित राहाण्यासाठी अजित पवार छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सकाळी दाखल झाले तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना महानंद चालविण्यासाठी संधी दिली होती. त्यात ते अपयशी ठरले. आता ही डेअरी डबघाईला आली आहे. तिला उर्जितावस्था देण्यासाठी 'एनडीडीबी'ने प्रस्ताव दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तोटा भरून काढण्यासाठी सरकारने भागभांडवल द्यावे. व्यवस्थापन त्यांचे राहील. यापूर्वी जळगाव येथील डेअरी चालविण्यासाठी 'एनडीडीबी'ने घेतली होती. ती सुस्थितीत आल्यावर आता ती लोकप्रतिनिधी चालवतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महानंद संबंधीचा निर्णय घेतला जाईल.

विरोधक मात्र, आता महानंदची मोक्याची ५० एकर जागा जाणार, ही डेअरी गुजरातच्या घशात घातली, असे थोतांड पसरवत आहेत. नेहमीच गुजरातच्या नावाने खडे फोडायचे, ही त्यांची निवडणुकीची लाईन ठरलेली आहे.

 छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला सॉफ्ट लोन संदर्भात कळविले होते. पण, अतुल सावे यांनी सांगितले की, कर्जाची परतफेड करण्याची मनपाची क्षमता नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही तिघेही बसून व्यावहारिक मार्ग काढू.

या जिल्ह्या वार्षिक योजनेसाठी सध्या ५६० कोटींचा निधी आहे. मात्र, हा निधी अपुरा असून तो वाढवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. पुढील वर्षी समाधानकारक वाढीव निधी दिला जाईल. पोलिस आयुक्तालयातील शस्त्रागार ईमारत मोडकळीस आल्यामुळे नवीन ईमारतीसाठी आयुक्तांनी ७० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिव्यांग भवन उभारण्यासाठी ५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी त्यासाठी१० कोटींची तरतूद केली आहे. राज्यात अशी सहा ठिकाणी दिव्यांग भवने उभारण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल.यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. सतिष चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार