लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा प्रकरणाने राक्षसीरूप धारण केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या नागपूर येथील बैठकीवर बहिष्कार टाकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समांतर जलवाहिनी योजनेचे काय करायचे, याबाबत शिवसेनेने बुधवारी मातोश्रीवर खल केला.पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन आदींची त्या बैठकीला उपस्थिती होती. मुंबईहून आल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, पक्षप्रमुख ठाकरे यांनी कचरा निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजनांची, स्मार्ट सिटी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासह रस्त्यांच्या कामाची माहिती जाणून घेतली. समांतर जलवाहिनीबाबत २४ जुलै रोजी होणाºया सभेत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सभापती आणि सभागृहनेत्यांना पक्षनिरोप येईल. महिनाभरात बहुतांश निविदा मार्गी लागतील, कचरामुक्त शहरासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनपा बरखास्तीबाबत केलेल्या वक्तव्याचे काहीही वाईट वाटले नाही. आ. इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप नाटकी असल्याचा टोला महापौरांनी शेवटी लगावला.
खल; भाजपचा कचऱ्यावर; शिवसेनेचा समांतरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:32 IST