शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अव्यवस्थेमुळे ‘डीआरएम’ ची नाराजी

By admin | Updated: June 16, 2014 01:19 IST

जालना : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या जालना रेल्वेस्थानकाची रविवारी नांदेड विभागाचे महाव्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी पाहणी केली.

जालना : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या जालना रेल्वेस्थानकाची रविवारी नांदेड विभागाचे महाव्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी पाहणी केली. मात्र तेथे आढळून आलेल्या अव्यवस्थेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले.दुपारी १ वाजता महाव्यवस्थापक शर्मा जालना रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्थानकावर सर्व भागात जाऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली. प्लॅटफार्मवर तुटलेले बेंच, सार्वजनिक नळाजवळ दुर्गंधी, तुटलेले नळ त्यांना दिसून आले. शिवाय स्थानकावर भिंतींना लागलेले जाळे, तुटलेली फरशीही त्यांनी पाहिली. स्थानकावर नवीन इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या सर्व बाबींमुळे शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली.स्थानकाजवळील रेल्वे गेट बंद असताना नागरिक तेथून गेटच्या खालून वाहने घेऊन ये-जा करताना शर्मा यांना आढळून आले. या रेल्वेगेटवर भूमिगत पूल बनविण्याची मागणी नागरिकांनी यापूर्वी केलेली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी शर्मा यांना सांगितले. कॅन्टीनवर विक्री होणारी खाद्यपेये, चहा, कॉफीच्या नमुन्यांचीही त्यांनी तपासणी केली. महाव्यवस्थापकांसमवेत रेल्वेचे अधिकारी वानखेडे, डॉ. माथुर, डॉ. कुरलीकर, स्थानकप्रमुख वळवी आदींची उपस्थिती होती.जालना रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेगेट बंद होत असल्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी भूमिगत पूल तयार करण्यात यावा, अशी मागणीही प्रवाशांच्या वतीने करण्यात आली. दरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात क्रॉसिंग गेट क्रमांक तयार करण्याची मागणीही करण्यात आली. जालना रेल्वेस्थानकावर एटीएम तसेच सी.सी.टी.व्ही. लावण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, प्रकाश जैन, मो. फेरोजअली, अ‍ॅड. दुर्गादास कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)... अन् स्थानक झाले चकचकीतमहाव्यवस्थापक शर्मा हे आज तपासणीसाठी येणार असल्याने गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत स्थानक चकचकीत करण्यात आले. मात्र तरीही काही त्रुटी राहिल्याने झाडू घेऊन कामगार सफाई करताना आढळून आले. प्लॅटफॉर्मवर दुर्गंधी नव्हती. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीवर सुद्धा दुर्गंधी दिसून आली नाही. अचानक स्थानक चकचकीत कसे झाले, याविषयी प्रवाशांमध्ये चर्चा सुरू होती. बंद गेट मधून सुरू असलेली वाहतूकही पाहिलीजालना रेल्वेस्थानकानजीक असलेल्या रेल्वेगेटवर गेट बंद असतानाही नेहमी नागरिकांची विशेषत: वाहनधारकांची ये-जा सुरू असते. महाव्यवस्थापक शर्मा हे स्थानकाच्या परिसराची पाहणी करत असताना त्यांना हा प्रकार दिसला. या गेटवर भूमिगत पूल असावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून होत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे भूमिगत पूल तयार करून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी मागणी शर्मा यांच्याकडे काही संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. महाव्यवस्थापक पी. सी. शर्मा यांना यावेळी काही संघटनांच्या वतीने निवेदने सादर करण्यात आली. जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे जनशताब्दी एक्स्प्रेसला औरंगाबाद ऐवजी जालन्यातून सोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हैद्राबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ एक तास अगोदर करावी. कारण त्याद्वारे येणारे प्रवासी परभणी, सेलूपर्यंत वेळेवर येतात. मात्र सेलू येथून औरंगाबाद येथे जाण्यासाठी सुमारे २ ते ३ तासांचा कालावधी लागतो, असेही त्यात नमूद करण्यात आले.