लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी महिलेस कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यास महावितरणने तब्बल सात वर्षे टाळाटाळ केली. परिणामी शेती बागायती होऊ शकली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून महावितरणने ३५ हजार ५०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत.महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत कृषिपंपाला वीज जोडणी मिळावी यासाठी घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील नागरबाई बाबुराव वायकर यांनी दि. ६ जून २०१० मध्ये महावितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यासाठी सात हजार ८५० रुपयांचे कोटेशन भरले. परंतु त्यांना जोडणी मिळाली नाही. महिला शेतकऱ्याने वारंवार लेखी अर्जाद्वारे महावितरणकडे जोडणीची मागणी केली. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. जोडणी नसतानाही २०१३ मध्ये नागरबाई वायकर यांना चार हजार ७४० रुपयांचे वीज बिल पाठवले. त्यामुळे त्यांनी येथील जिल्हा तक्रार निवारण मंचात धाव घेत शेती पिकांच्या नुकसानपोटी पाच लाख ८० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा स्मीता कुलकर्णी, सदस्य मंजुषा चितलांगे, सुहास आळशी यांनी प्रकरणातील सर्व मुद्यांची पडताळणी केली.
वीज जोडणीस टाळाटाळ, भरपाईचे आदेश
By admin | Updated: July 7, 2017 01:05 IST