शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:39 IST

अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.

ठळक मुद्देजागतिक पर्यटन दिन : पर्यटकांच्या गरजेनुसार शहरात भौतिक सुधारणा आवश्यक

रुचिका पालोदकरऔरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.सध्या अनेक व्यवसाय हे आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांपर्यंत आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचायचे असेल, तर आपला किंवा आपल्या उद्योगाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ असणे अत्यंत आवश्यक आहे. भरघोस उत्पन्न आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाºया पर्यटन व्यवसायानेही डिजिटल युगाची पावले ओळखत कात टाकणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच २०१८ च्या पर्यटन दिनासाठी खास ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.जागतिक ख्यातीची पर्यटनस्थळे शहरात असूनही या स्थळांचा डिजिटल माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात पर्यटन मंडळ कमी पडत असल्याचे दिसून येते. या मंडळाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ केवळ नावालाच असून ‘अपडेट’ राहणे आणि पर्यटन स्थळांचे ‘डिजिटल मार्के टिंग’ करून अधिकाधिक पर्यटक ांना शहराकडे आकर्षित करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मागे पडते आहे. एमटीडीसीची वेबसाईट पुस्तकी स्वरूपातील असून, त्यावर पर्यटन स्थळांची सर्व माहिती उपलब्ध तर आहे. मात्र, सध्याच्या काळानुसार पर्यटनस्थळी असणारे तिकिटांचे दर, तिकि टांचे आॅनलाईन बुकिंग या सर्व सुविधांचा येथे अभाव आहे. येथील दूरध्वनी क्रमांकही जुने असून ते बदलणेही आवश्यक आहे. या गोष्टीमुळे पर्यटक इतर संकेतस्थळांना भेटी देतात. प्रत्येक संकेत स्थळावर वेगवेगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणती माहिती ग्राह्य धरावी, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे अभ्यासपूर्ण लेखन (ब्लॉग), पर्यटन स्थळांसंबंधीचे वृत्त, या क्षेत्रात होणारे बदल या सर्व गोष्टी वारंवार संकेतस्थळावर टाकाव्यात, तसेच फे सबुक पेज, टिष्ट्वटर या माध्यमातूनही पर्यटन स्थळांचा अधिकाधिक प्रचार करावा, असे काही बदल पर्यटनप्रेमींनी सुचविले.चौकट :- परदेशी पर्यटकांनी दिवसभर पर्यटन केल्यानंतर त्यांना सायंकाळच्या वेळी त्यांच्या पद्धतीनुसार मनोरंजनासाठी शहरात काही सुविधा उपलब्ध असणेही बदलत्या काळानुसार गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या लोककलांविषयी माहिती देणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, नाईट क्लब, खास परदेशी नागरिकांच्या पद्धतीनुसार उभी करण्यात आलेली रेस्टॉरंटस् या सर्व गोष्टी शहरात सुरू झाल्यास त्याचा पर्यटनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.- पर्यटकांच्या दृष्टीने शहरात उत्कृष्ट बाजारपेठ निर्माण होणेही आवश्यक आहे. याच धर्तीवर अवाढव्य खर्च करून कलाग्रामचा पांढरा हत्ती उभारण्यात आला; परंतु चुकीची जागा निवडल्यामुळे आणि अन्य काही कारणांमुळे थोड्या दिवसात तेथील ‘कला’ लोप पावली असून केवळ ‘ग्राम’ उरले आहे.चौकट :रस्ते आणि कचरा हे मुख्य अडसर-डिजिटल प्रेझेन्ससोबतच शहरात भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील रस्ते आणि कचरा या दोन गोष्टी प्रामुख्याने अडसर ठरत आहेत. रस्ते दुरुस्ती हे प्रशासनाचे काम असले तरी कचºयासाठी मात्र सामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. परदेशी नागरिकांना आपल्या शहरात स्वच्छ वाटावे म्हणून मनपाच्या बरोबरीने नागरिकांनी प्रयत्न केल्यास ही एक मोठी देशसेवा होईल.- जसवंतसिंगसहल आयोजक

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणीtourismपर्यटन