शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: December 23, 2023 14:15 IST

लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी आपण पक्षाकडे मागितली नाही, पण पक्षाने दिल्यास निवडणूक लढेन अशी आपली भूमिका असल्याचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेकडून माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दावा सांगत आहेत. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या मतदार संघावर हक्क सांगितला जात आहे. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ. दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याविषयी काही ठरले का, या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले की, पक्षाने अद्याप कोण उमेदवार असेल हे निश्चित केले नाही. आपणही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन.

असे असेल संभाव्य जागा वाटप शिवसेना २०,काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला १० आणि अन्य २ असे जागावाटपाचे सुत्र. महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभेच्या जागा वाटप करण्यात आले नाही.असे असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना २०, काँग्रेस १६,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० आणि वंचीत बहुजन आघाडीला १ , राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला १ असे जागा वाटप शिवसेनेकडून प्रस्तावित करण्यात आल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.मात्र हे जागा वाटप काँग्रेस पक्ष मान्य करण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा