शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४०० वर्षांपूर्वीचे चिंच अन शमीच्या झाडालगतचे कार्येश्वर महादेव मंदिर पाहिले का ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 31, 2023 13:26 IST

अधिक मास विशेष : साताऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान

छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यात निसर्गरम्य वातावरणात शमी व चिंच वृक्षाच्या मधोमध स्थापित कार्येश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक रोज येत आहेत. अधिक मासानिमित्त सोमवारी येथे विशेष गर्दी पाहण्यास मिळते.

साताऱ्याकडून भारत बटालियनकडे जाताना डाव्या बाजूस एक रस्ता देवळाईकडे जातो. याच रस्त्यावर हे मंदिर आहे. समोरील बाजूस भले मोठे चिंचेचे झाड हीच या मंदिराची खूण आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे हे झाड असल्याने येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मंदिरात जाताना पूर्व बाजूला प्रथम कार्येश्वर गणपती बाप्पाचे दर्शन होते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. अनेकांना वाकूनच आत जावे लागते. गाभाऱ्यात ६ बाय ४ फुटांच्या भव्य शिवलिंगाचे दर्शन होते. याच मंदिराच्या बाजूला सप्तर्षींची समाधी आहे. या समाधीमुळे पूर्वी येथील नागरिक या मंदिराला समाधीचे महादेव मंदिर असेही म्हणत. मात्र, अलीकडच्या काळात ‘कार्येश्वर महादेव मंदिर’ असे नामकरण करण्यात आले. याच मंदिरासमोर दाट दुर्वा उगवल्या आहेत. दक्षिण बाजूस अनेक झाडे असून, त्यात एक शमीचे झाड आहे. तसेच पूर्व बाजूला एक ओढा आहे. याच ओढ्याच्या काठावर हे प्राचीन मंदिर आहे. शहराजवळच, पण वर्दळीपासून दूर निसर्गरम्य, शांत वातावरणातील कार्येश्वर महादेव मंदिर सातारा व देवळाई परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

भगवान श्रीरामाने मुक्काम केल्याची आख्यायिकाहे शिवलिंग किती प्राचीन आहे याचे दाखले देण्यासाठी येथील नागरिक आख्यायिका सांगतात. सीतेच्या शोधात जेव्हा श्रीराम निघाले, तेव्हा त्यांनी येथे मुक्काम केला होता. सप्तर्षी (सात ऋषी) काही काळ या परिसरात राहत होते. त्यांनीच येथे महादेवाची पिंड स्थापन केली, अशीही आख्यायिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकांनी त्या काळी काही दिवस या मंदिराच्या परिसरात मुक्काम केला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक