शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 19, 2024 13:29 IST

फ्लॅश बॅक: औरंगाबादचे पहिले खासदार कॉँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य, पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव

औरंगाबाद : देशातील पहिलीच निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय? ते कसे करतात? आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता. याचे प्रत्यंतर मतमोजणीतून दिसले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव केला.

इंग्रज राजवटीच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या भारतात २५ ऑक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. देशभरात चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले; परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून, तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात ऑक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटीभारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतपेटी मतदान केंद्रावर ठेवली होती. या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवलेल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्यांच्या पेटीत ही मतपत्रिका टाकावी लागत होती.

सर्वसाधारण मतदारसंघ, कॉँग्रेसचा दणदणीत विजयऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (क्रमांक ११) तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणुकीत होते, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्यांची नावे व त्यांना झालेल्या मतदानाची माहिती आहे. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांना ७१ हजार ९२ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.

पहिल्या खासदाराचा अल्प परिचयडॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबादेतील हिमायत नगरचे मूळ रहिवासी होते. उच्च विद्याविभूषित असलेले डाॅ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरूकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी.लीट. झाले. जर्मनीतूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने १९३० मध्ये त्यांना कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी विदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते ४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये इंटर पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता.

असे होते मतदारसंघपहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते. तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटी प्रवर्गातील होता.

काँग्रेसचा ३६४ जागांवर विजयदेशभरात १८४९ उमेदवार उभे होते. ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते. ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशॅलिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले होते. भारतीय जनसंघाचे तीन खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४