औरंगाबाद : कोविड संसर्ग रोखण्यासाठी चौकाचौकात नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना ठेंगा दाखवत दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरट्यांनी दोन दुचाकी पळवल्या. गोकुळवाडी येथे गणेश भगवान दहिभाते यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० एआर ७६००) उभी करून ठेवली होती. ही दुचाकी चोरट्यांनी १० मे रोजी दुपारी १२:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान लंपास केली. ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ११ मे रोजी भरदिवसा झालेल्या अन्य एका घटनेत औरंगपुरा येथील एका दुकानासमोर अनिल सुधाकर ठोकळ यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० डीए ९४१०) उभी केली होती. ही दुचाकी चोरट्यांनी सायंकाळी ४.१५ ते रात्री ९.३० दरम्यान लंपास केली. हा प्रकार समोर आल्यावर अनिल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नाकाबंदीतही दुचाकी चोरट्यांची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:04 IST