शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद शहर झाले हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 19:18 IST

केंद्रीय पथकाने धर्माबाद शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. या कामगिरीमुळे धर्माबाद नगरपालिकेस शासनाकडून प्रोत्साहनपर १ कोटी निधी प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय पथकाने  बुधवारी (दि. १९) धर्माबाद शहराची पाहणी केलीशहर सर्व निकषात पास झाले असून, या पथकाने धर्माबाद शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केलेनगरपालिकेस शासनाकडून प्रोत्साहनपर १ कोटी निधी प्राप्त होणार आहे.

ऑनलाईन लोकमत 

नांदेड/ धर्माबाद : स्वच्छ भारत अभियानाच्या केंद्रीय पथकाने  बुधवारी (दि. १९) धर्माबाद शहराची पाहणी केली. यात  शहर सर्व निकषात पास झाले असून, या पथकाने धर्माबाद शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. या कामगिरीमुळे धर्माबाद नगरपालिकेस शासनाकडून प्रोत्साहनपर १ कोटी निधी प्राप्त होणार आहे.

प्रथम जिल्हा पथक नंतर राज्य पथक व आता केंद्रीय पथकाने शहरास हगणदारी मुक्त शहर घोषित केले आहे. धर्माबाद शहराच्या लौकिकात या कामगिरीने अजून भर पडणार आहे. नगरपालीकाने  गेली दोन वर्षे स्वच्छतेवर भर देऊन विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधली. नगरपरिषद अध्यक्षा अफझल बेगम अ. सत्तार, उपनगराध्यक्ष  विनायकराव कुलकर्णी, सर्व न.प. सदस्य व सर्व कर्मचारी यांनी शहर लोटामुक्त करण्यासाठी विविध मार्गा वापरून प्रयत्न केले.

नगर पालिकेने  शहरात गुड मॉर्निंग व गुड इव्हेनिंग पथके तैनात केली, विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सोय केली. शहरातील  सामाजिक संघटना, शाळा, कॉलेजेस, व्यापारी, पत्रकार यांच्यासह  सर्व नागरिका या महत्वकांक्षी योजनेत सहभाग झाली. याबद्दल मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शासनाच्या पुढील योजनांमध्ये देखील असाच सर्वांचा सहभाग रहावा असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.