शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे एकच दुखणे : मनोज जरांगे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 09:38 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे. याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर  वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.   

केंद्र सरकारने आरक्षण द्यावे : अमित देशमुखछत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने आता वेळ न घालवता मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी आपली भूमिका असल्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली.

महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा : चव्हाण नांदेड : बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले असून, जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.   

सरकारचे दोन्ही दरडींवर पाय : जयंत पाटील मुंबई : राज्य सरकारमधील काही लोक ओबीसींना चुचकारत आहेत, तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तुम्ही एका ठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.

भावनेचा आदरचकार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. यामुळे आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटते आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील